शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक दहशतवादी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 05:04 IST

बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर लष्कराने लष्कर-ए-तय्यबाच्या आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले असून

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर लष्कराने लष्कर-ए-तय्यबाच्या आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले असून त्याच्या चार साथीदारांचा खात्मा केला. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव सज्जाद अहमद (२२) असून तो नैऋत्य पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुजफ्फरगड येथील रहिवासी आहे.काही आठवड्यांपूर्वीच उधमपूरमध्ये हल्ला करणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद याला नागरिकांच्या मदतीने जिवंत पकडण्यात लष्कराला यश आले होते. चकमकीत एका दहशतवाद्याला बुधवारीच यमसदनी धाडण्यात आले होते तर तिघांचा गुरुवारी खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांसोबत संघर्षात एक जवान जखमी झाला. रफियाबादजवळ दहशतवाद्यांचा एक गट दडून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपासून रफियाबाद क्षेत्रात पानजलापर्यंत शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान, जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी आमच्यासाठी ठोस पुरावा आहे. पाकिस्तानच्या सहभागाबद्दल कुठलीही शंका नाही. या अटकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका मांडण्यास मदत मिळेल, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले. गुंफा सापडली : त्यांच्या या हालचाली लष्कराच्या गोपनीय तंत्रज्ञानाद्वारे टिपण्यात आल्या होत्या. त्यानुसार वेढा घालण्यात आला. बुधवारी चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. परंतु त्याच्या इतर साथीदारांचा ठावठिकाणा नव्हता. हे दहशतवादी भारतीय क्षेत्रातच दडून बसले असावेत असा संशय होता. त्यानुसार त्यांच्या शोधाकरिता एक पथक तयार करण्यात आले. शोधमोहिमेत रफियाबादच्या पहाडी भागात एक गुंफा सापडली. सुरक्षा दल तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूकेला. प्रत्युत्तरातील कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. चिली बॉम्बने घाबरला दहशतवादीलष्कराच्या जवानांनी गुहेत दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी गुफेत ‘चिली बॉम्ब’ (तिखट) आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले. त्यानंतर घाबरलेला सज्जाद दयायाचना करूलागला. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी केली होती. लष्कराने शोधमोहीम सुरू केल्यानंतर हे दहशतवादी एका गुहेत लपून बसले होते. लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, येथून १०० किमी उत्तरेला व्याप्त काश्मिरातून घुसखोरी करणाऱ्या लष्कर-ए-तय्यबाच्या या पाच दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेलगतचे सुरक्षाकडे तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता.शस्त्रसाठा जप्तजम्मू क्षेत्रात किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलाने गुरुवारी दहशतवाद्यांच्या एका तळाचा शोध घेऊन तेथील शस्त्रास्त्र व दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त केला. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तुलमध्ये तैनात राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शालोग गावाजवळ नईगड नाला भागात शोधमोहीम राबविली होती. यादरम्यान हे तळ सापडले. यापूर्वी २४ आॅगस्टला रामबन आणि २५ला रेयासी जिल्ह्यातील जंगलात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.सज्जादची कबुली : प्राथमिक चौकशीत सज्जादने तो पाकिस्तानचा असून लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा सदस्य असल्याचे कबूल केले आहे. लष्करचा प्रमुख हाफिज सईद याच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचेही त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोहिमेत रफियाबादच्या पहाडी भागात एक गुंफा सापडली. सुरक्षा दल तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरातील कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले.