धुळ्यात आणखी एका शिक्षकाची आत्महत्या
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
धुळ्यात आणखी एका शिक्षकाची आत्महत्या
धुळ्यात आणखी एका शिक्षकाची आत्महत्या
धुळ्यात आणखी एका शिक्षकाची आत्महत्याधुळे : शहरात ताण-तणावातून आश्रमशाळा शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली़ शुक्रवारीदेखील विद्यानगरी परिसरातच शिक्षकाने आत्महत्या केली होती़ विलास मोतीराम पाटील (४८) असे शिक्षकाचे नाव आहे़ ते मोरदडतांडा येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होते़ काही दिवसांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होेते़ तसेच ते मद्याच्या आहारीदेखील गेले होते़ त्यातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे़ पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ शुक्रवारी देवपुरातीलश्री एकवीरादेवी विद्यालयाचे शिक्षक सुकलाल राघो मुसळदे (वय ३९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़ मुसळदे वैफल्यग्रस्त झाले होते. ते मद्याच्या आहारी गेले होतो. कधी कधी शाळेतही यायचे नाहीत. त्यामुळे त्यांना संस्थेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. (प्रतिनिधी)