शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधून आणखी एक पाकिस्तानी हेर ताब्यात

By admin | Updated: October 28, 2016 13:15 IST

हेरगिरी प्रकरणी राजस्थानमधून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 -  राजधानी नवी दिल्लीतून गुरुवारी हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तर याला अटक करण्यात आल्यानंतर आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली आहे. शोएब असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला राजस्थानमधील जोधपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
याआधी,  दिल्लीतून हेरगिरीप्रकरणी मौलाना रमजान आणि सुभाष जांगिड यांनादेखील पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. या दोघांना पटियाला हाऊस कोर्टाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांवर अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरपर्यंत पोहोचवण्याचा आरोप आहे. 
 
(हेरगिरी करणा-या पाक अधिका-यावर कारवाई, नंतर सुटका)
 
दरम्यान, गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरला हेरगिरीच्या आरोपावरुन ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर काही वेळाने त्याची सुटका करण्यात आली असून त्याला तातडीने भारत सोडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. 
 
या पाकिस्तानी अधिका-याकडे भारतीय लष्करासंबंधी अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रं आढळून आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हा अधिकारी पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.