शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक

By admin | Updated: June 26, 2016 02:35 IST

आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असता

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अटक केली. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कारवाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी यांनी राजधानी दिल्लीत आणीबाणी लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष असलेले मोहनिया यांना एका पोलीस अधिकाऱ्याने दुपारी १२.१ वाजताच्या सुमारास दक्षिण दिल्लीच्या खानपूर येथील त्यांच्या कार्यालयातून अक्षरश: खेचून बाहेर काढले. त्या वेळी ते एक पत्रपरिषद घेत होते. दक्षिण पूर्वचे संयुक्त पोलीस आयुक्त आर.पी. उपाध्याय यांनी सांगितले की, मोहनिया यांच्यावर भादंविच्या ३२३ (जाणूनबुजून नुकसान पोहोचविले), ५०६ (धमकी देणे), ५०९ (महिलेचा विनयभंग), ३५४ (विनयभंगाच्या हेतूने महिलेसोबत बळजबरी), ३५४ ए (लैंगिक अत्याचार) आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगम विहार क्षेत्राचे आमदार असलेले मोहनिया यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मोदी यांनी दिल्लीत आणीबाणी जाहीर केली आहे. दिल्लीच्या जनतेने ज्यांना निवडले त्यांना अटक केली जात आहे. त्यांच्यावर धाडी घालणे, दहशत निर्माण करणे आणि खोटे गुन्हे नोंदविण्याचे सत्र सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे. दिनेश मोहनिया यांना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमक्ष पत्रकार परिषदेत अटक करून मोदींना काय संदेश द्यायचा आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. फेब्रुवारी २०१५मध्ये दिल्लीत आपचे सरकार आरूढ झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अटक केलेले मोहनिया हे आपचे आठवे आमदार आहेत. आ. दिनेश मोहनिया यांना अटकेनंतर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्यांच्या वकिलांनी आ. मोहनिया यांना जामीन मिळावा, अशी विनंती केली. मात्र त्यांना सोमवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहे प्रकरण- गेल्या २३ जूनला महिलांच्या एका गटाने मोहनिया यांच्याविरोधात नेबसराय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. - २२ जूनला या महिला पाण्याच्या समस्येवरून तक्रार करण्याकरिता मोहनिया यांच्याकडे गेल्या होत्या. त्या वेळी बाचाबाची झाली आणि आमदारांनी छेडखानी केल्याचा आरोप आहे. मोहनिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. माझ्यावरील आरोप निराधार : आ. मोहनिया यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मी पोलीस तपासात सहकार्य करण्यास तयार आहे; पण माझ्यावरील आरोप निराधार आहेत, असा दावा त्यांनी केला.