शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

अवकाशात भारताचा आणखी एक डोळा!

By admin | Updated: June 24, 2017 02:59 IST

दहशतवादी तळांवर नजर ठेवण्यसाठी आणि पाकिस्तानी बंकर हेरण्यासाठी भारताने अवकाशात आणखी उपग्रह पाठवला आहे.

नवी दिल्ली : दहशतवादी तळांवर नजर ठेवण्यसाठी आणि पाकिस्तानी बंकर हेरण्यासाठी भारताने अवकाशात आणखी उपग्रह पाठवला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने पुन्हा एकादा एकाच वेळी अनेक उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे यावेळी भारताने जपान, अमेरिका आणि इंग्लंडसारख्या प्रगत देशांतीलही उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी सेवा दिली आहे. इस्रोने शुक्रवारी सकाळी पीएसएलव्ही-सी३८ या अग्निबाणाद्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी ९.२९ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केल्यानंतर २७ मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - २ मालिकेतील उपग्रहासह अन्य २९ छोट्या उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४० वे उड्डाण होते. ३१ उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि २९ परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट - २ मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन ७१२ किलो असून, अन्य ३० उपग्रहांचे मिळून २४३ किलो वजन आहे.कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात पाठवला गेला आहे. शेती पीक व आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल. इस्त्रोने फेब्रुवारीत एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता. १४ देशांना दिली सेवाआॅस्ट्रिया, बेल्जियम, चिली, चेझ रिपब्लिक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लॅटव्हिया, लिथूआनिआ, स्लोवाकिया, इंग्लंड, अमेरिका. या नव्या डोळ्यातून काय दिसणार?अर्धा स्क्वेअर मीटर एवढ्या छोट्या आकाराची कोणतीही वस्तू हा उपग्रह टिपणार आहे.भारतीय सीमेपलीकडे पाकमध्ये होणाऱ्या हालचाली टिपता येणार.छोटे-छोट बंकरही लष्कराला दिसू शकणार, त्याची माहिती मिळणार.दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला मदत होणार.यापूर्वी पाठवण्यात आलेल्या कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांनी लष्करासाठी मोठी मदत केली आहे. कार्टोसॅटद्वारे पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांच्या मदतीनेच लष्कराने पाक सीमेवरील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते.