शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मंदसौरमध्ये आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: June 10, 2017 00:26 IST

पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली.

मंदसौर : पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली. पोलिसांच्या मारहाणीतच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे त्या भागात तणाव कायम असून, तेथील इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे. तेथील संचारबंदी सकाळी १0 ते संध्याकाळी ६ या वेळेत शिथिल करण्यात आली होती. मात्र रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या तिथे तैनात आहेत.घन:श्याम धाकड (२६) हे रात्रीच्या वेळी मंदिरात जात असताना पोलिसांनी या शेतकऱ्याला अडवून त्याला लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर या शेतकऱ्याला इंदोरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. या शेतकऱ्याचेतीन सहकारी दिनेश मालवी, शिवनारायण मालवी आणि गणेश मालवी हे बेपत्ता असल्याचा दावा काँग्रेसचे नेते माजी खासदार सज्जन सिंह वर्मा यांनी केला आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि शवविच्छेदनाचा व्हिडिओ तयार करावा, अशी मागणीही वर्मा यांनी केली आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत १५६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हाधिकारी श्रीवास्तव यांनी सांगितले की, अनेक एटीएम सुरु झाले असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत होण्यास काही वेळ लागू शकतो. या आंदोलनात जळालेली दुकाने आणि वाहने यांचा अहवाल तयार करण्यात येत असून संबंधितांना ही मदत चेकने देण्यात येईल. शेतकरी आंदोलन आता छिंदवाडा जिल्ह्यातही पोहचले आहे. मंदसौरच्या पिपलीमंडीत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तथापि, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी नवा प्रस्ताव देण्यात आला आहे. मतभेद दूर करण्यासाठी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे यात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)