शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बीफ बॅन विरोधात आणखी एका भाजपा नेत्याचा राजीनामा

By admin | Updated: June 6, 2017 13:08 IST

बीफ बॅनला विरोध दर्शविण्यासाठी मेघालय भाजपमधील आणखी एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

तुरा, दि. 6-  गोमांस विक्री, अवैध कत्तलखान्यांविरोधात  मेघालय भाजपामधील आणखी एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मेघालयातील नॉर्थ गारो हिल्सचे भाजपाचे अध्यक्ष बाचू माराक यांनी पक्षाकडे आपला राजीनामा दिला आहे. वेस्ट गारो हिल्सचे जिल्हाध्यक्ष बर्नार्डर माराक यांनी बीफ बॅनला विरोध करण्यासाठी राजीनामा दिला होता त्याचवेळी बाचू यांनीही  राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.  सोमवारी रात्री बाचू यांनी राजीनामा दिला आहे. 
 
"गारोमधील लोकांच्या भावनांसोबत मी तडजोड करू शकत नाही. या जिल्ह्याचा नागरीक असल्याने येथिल लोकांच्या हिताचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. बीफ खाणं आमची संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे.  भाजपची बेकायदेशीर विचारसरणी आम्ही स्विकारणार नाही", असं मत बाचू माराक यांनी व्यक्त केलं आहे.
 
बाचू माराक यांनी भाजपाचे प्रदेश युनिट अध्यक्ष शिबुन लिंगदोह यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. नुकतंच मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गारो हिल्समध्ये  बीफ पार्टीचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर भाजपा पक्षातून तीव्र टीका झाली होती. भाजपाचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी बाचू यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला  होता.  भाजपचे नेते बाचू यांनी फेसबुकवरून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. 
 
"माझी परंपरा आणि संस्कृती हे माझ्यासाठी प्राधान्य आहे, पक्ष सगळ्यात शेवटी येतो.  प्रत्येक वेळी बीफचा मुद्दा का उचलला जातो ? इतर पशुंबदद्ल का बोललं जात नाही, असा सवालही त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला होता.  बर्नार्ड मराक या माजी भाजपा नेत्याने 10 जून रोजी तुराच्या ईडनबारीमध्ये बीफ पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीच बाचू सहभागी होण्याची शक्यता आहे.