ठामपाच्या ताफ्यात आणखी ५ व्होल्वो बस * १५ डिसेंबरपासून ठाणे ते दादर दरम्यान धावणार
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
ठाणे- केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूथ्थान कार्यक्रमांतर्ग ठाणे परिहवन सेवेस २३० बसेस खरेदी करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी १० वातानुकूलित व्होल्वो बसेस ऑक्टोंबरमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी ५ वातानुकूलित व्होल्वो बस येत्या १५ डिसेंबर पासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. या बस ढोकाळी ते दादर , कोलशेत ते दादर, धर्मवीरनगर ते दादर, वृंदावन सोसायटी ते दादर आणि लोढा कॉम्प्लेक्स ते दादर अशा मार्गांवर धावणार आहेत. ढोकाळी येथून पहिली बस ७.३० वाजता सुटणार असून ही बस दादरहून ९.१० परत येणार आहे. कोलशेत येथून ७.४५ पहिली बस निघणार असून हीच बस ९.२५ला दादर येथून परतीच्या मार्गावर धरणार आहे. धर्मवीरनगर येथून ७.२० ला तर दादरहून ८.५० पहिली बस सुटणार आहे. वृंदावन येथून ८.१० ला तर दादरहून ९.४० ला पहिली बस निघणा
ठामपाच्या ताफ्यात आणखी ५ व्होल्वो बस * १५ डिसेंबरपासून ठाणे ते दादर दरम्यान धावणार
ठाणे- केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूथ्थान कार्यक्रमांतर्ग ठाणे परिहवन सेवेस २३० बसेस खरेदी करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी १० वातानुकूलित व्होल्वो बसेस ऑक्टोंबरमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी ५ वातानुकूलित व्होल्वो बस येत्या १५ डिसेंबर पासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. या बस ढोकाळी ते दादर , कोलशेत ते दादर, धर्मवीरनगर ते दादर, वृंदावन सोसायटी ते दादर आणि लोढा कॉम्प्लेक्स ते दादर अशा मार्गांवर धावणार आहेत. ढोकाळी येथून पहिली बस ७.३० वाजता सुटणार असून ही बस दादरहून ९.१० परत येणार आहे. कोलशेत येथून ७.४५ पहिली बस निघणार असून हीच बस ९.२५ला दादर येथून परतीच्या मार्गावर धरणार आहे. धर्मवीरनगर येथून ७.२० ला तर दादरहून ८.५० पहिली बस सुटणार आहे. वृंदावन येथून ८.१० ला तर दादरहून ९.४० ला पहिली बस निघणार आहे. तर लोढा येथून पहिली बस ८.२५ ला तर दादरहून ९.५५ परतीची पहिली बस सुटणार आहे. या पाचही मार्गावर दिवसातून त्या बसेसच्या पाच फेर्या काही तासांच्या अंतरांवर होणार आहेत....................(प्रतिनिधी/ पंकज रोडेकर).......................वाचली- नारायण जाधव