शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीत आणखी ५ बडे मासे गळाला!

By admin | Updated: February 21, 2015 04:05 IST

पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात शुक्रवारी रात्री आणखी ५ बडे मासे गळाला लागले असून हे पाचही बड्या कंपन्याचे अधिकारी आहेत.

नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात शुक्रवारी रात्री आणखी ५ बडे मासे गळाला लागले असून हे पाचही बड्या कंपन्याचे अधिकारी आहेत. या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना जेरबंद करण्यात आले आहे. कार्पोरेट हेरगिरी प्रकरणी राजधानी दिल्ली हादरलेली असतानाच हे पाच जण पोलिसांच्या हाती लागले. अटक करण्यात आलेले अधिकारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स अनिल धीरुभाऊ अंबानी समूह, एस्सार, केयर्न्स आणि इतर कंपन्याशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हेरगिरी प्रकरणातील आरोपींकडे वित्त, कोळसा आणि ऊर्जा मंत्रालयातील गोपनीय दस्तावेजासह अर्थमंत्र्याच्या आगामी अर्थसंकल्पीय भाषणातील काही अंशही आढळले आहेत. अटक करण्यात आलेल्यांत शैलैश सक्सेना (आरआयएल), विनय कुमार (एस्सार), के. के. नाईक (केयर्न्स), सुभाष चंद्र (ज्युब्लिएंट एनर्जी), ऋषी आनंद (रिलायन्स एडीएजी) यांचा समावेश आहे. अटक करणाऱ्यांत आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या तीन डायऱ्यांतून हे गुपित उघड झाले. या डायऱ्यांत अनेक महत्त्वाची नावे व नंबर्स असण्याची शक्यता आहे. या आरोपींकडे इतर मंत्रालयातील गोपनीय दस्तावेज असल्याचे संकेत गुन्हा अन्वेषण विभागाच्या चौकशीतून मिळतात. या प्रकरणात इतरांचाही समावेश आहे का? याचा छडा लावण्यासाठी पोलिस चौकशी करणार आहेत.चौकशी पूर्ण होऊ द्या...च्दोषींवर कारवाई झाली पाहिजे,असे सांगत पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान म्हणाले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया देईल. चौकशी पूर्ण होई द्या. कोणाचीही गय केली जाणार नाही. आरोपींना पोलिस कोठडी...च्दिल्ली कोर्टाने ७ पैकी ४ आरोपींना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शंतनु सैकिया, प्रयास जैन, राकेश कुमार आणि ललटा प्रसाद यांंची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. च्उर्वरित आशाराम, ईश्वर सिंग आणि राजकुमार चौबे यांना १४ दिवसांची न्यायालयी कोठडी सुनावण्यात आली आहे.