शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सीमा सुरक्षेसाठी आणखी ११ हजार महिला

By admin | Updated: May 18, 2015 02:44 IST

सीमेवरील तैनाती, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठीच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा दलात ११ हजारांपेक्षा अधिक महिलांची भरती करण्याचा

नवी दिल्ली : सीमेवरील तैनाती, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठीच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा दलात ११ हजारांपेक्षा अधिक महिलांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा दलांत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या हेतूने लवकरच ही भरती केली जाणार आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. यावर्षी कॉन्स्टेबल रूपात ६२ हजारांपेक्षा अधिक युवा पुरुष व महिलांची भरती करण्याची घोषणा सरकारने अलीकडेच केली होती. यापाठोपाठ केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि भारतीय तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी)सारख्या निमलष्करी दलांमध्येही ८५३३ महिला कॉन्स्टेबल भरती करण्याचीही सरकारची योजना आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सशस्त्र सीमा दलात २१ नव्या तुकड्या (कंपन्या) उभारण्यास आणि एकूण २७७२ महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे.येत्या काळात केंद्रीय दलांत महिलांचे प्रतिनिधित्व पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी महिलांची भरती केली जात आहे. सद्य:स्थितीत या दलांमध्ये महिलांची संख्या एकूण संख्येच्या केवळ २.१५ टक्के आहे. सीआरपीएफमध्ये दोन महिला बटालियन वाढविण्यास गृहमंत्रालयाने विशेष मंजुरी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)