शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा!

By admin | Updated: June 1, 2017 03:06 IST

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा

जयपूर: भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा गाईचे आणि गोवंशाचे रक्षण करण्यासाठी गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, अशी सूचना राजस्थान उच्च न्यायालयाने बुधवारी केली.गोहत्येसाठी असलेली शिक्षा वाढवून ती जन्मठेप अशी केली जावी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. न्या. महेश चंद्र शर्मा यांनी बुधवारी सेवानिवृत्त होण्याआधी दिलेल्या १४५ पानी हिंदी निकालपत्रात ही मते व्यक्त केली. सुमारे आठ हजार भेकड आणि बेवारस गायींचा सांभाळ करणाऱ्या जयपूरमधील हिंगोलिया पांजरापोळमध्ये गेल्या वर्षी शंभरहून अधिक गायी मरण पावल्या होत्या. त्यासंबंधीत जनहित याचिकेवर न्या. शर्मा यांनी हे निकालपत्र दिले.शेजारचे नेपाळ हिंदूराष्ट्र आहे व तेथे गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे, असा संदर्भ देत न्या. शर्मा यांनी म्हटले की, भारतातही गोवंशाचे रक्षण करणे हे राज्यघटेननुसार सरकारचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४८ नुसार गोवंशासह अन्य दुधाळ आणि शेतीयोग्य जनावरांच्या कत्तलीस प्रतिबंध करून त्यांचे वाण सुधारणे व त्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. गायीला ‘न्यायिक व्यक्तित्व’ बहाल करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. या अनुषंगाने त्यांनी राजस्थानचे मुख्य सचिव आणि अ‍ॅडव्होकेट जनरल यांची गाईंचे ‘कायदेशीर संरक्षक’ म्हणून नेमणूक केली व दोघांनी गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारशी पाठपुरावा करावा, असेहि निर्देश दिले. (वृत्तसंस्था)न्या. शर्मा यांनी नंतर पत्रकारांशी गप्पा मारताना या निकालपत्राचे विश्लेषण व समर्थन केले. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या प्रजननाविषयी धादान्त अवैज्ञानिक सिद्धांत पत्रकारांना सांगितला. न्या. शर्मा म्हणाले: जो मोर है, यह आजीवन ब्रह्मचारी है. वह मोरनी के साथ सेक्स नही करता. उसके जो आंसू आते हे, मोरनी उन्हे चुभकर गर्भवती होती है और मोर या मोरनी को जन्म देती है!