शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य सायन्टिफीक कॅपिंगचा मुद्दा

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

मडगावच्या सोनसडो प्रक्रिया यार्डातील साठवून ठेवलेल्या कचर्‍यावर सायन्टिफीक कॅपिंग म्हणजेच शास्त्रोक्त पद्धतीचे आवरण घालण्याच्या खर्चिक मुद्द्यावरून मागची तीन वर्षे हा प्रश्न भिजत पडला होता. या कामासाठी गोवा सरकारला किमान सात कोटी रुपये खर्च करावे लागणार होते. त्याशिवाय मडगाव पालिकेला सुमारे २0 हजार चौ.मी. जमीन सोडून द्यावी लागली असती. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली पणजीत झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा कॅपिंगचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला असून ट्राउमेल ॲण्ड फीव या पारंपरिक पद्धतीने साठवून असलेल्या कचर्‍याचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या नव्या निर्णयामुळे गोवा सरकारला या प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त एक कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्याशिवाय भली मोठी जमीन मडगाव पालिकेच्या ताब्यात राहाणे शक्य

मडगावच्या सोनसडो प्रक्रिया यार्डातील साठवून ठेवलेल्या कचर्‍यावर सायन्टिफीक कॅपिंग म्हणजेच शास्त्रोक्त पद्धतीचे आवरण घालण्याच्या खर्चिक मुद्द्यावरून मागची तीन वर्षे हा प्रश्न भिजत पडला होता. या कामासाठी गोवा सरकारला किमान सात कोटी रुपये खर्च करावे लागणार होते. त्याशिवाय मडगाव पालिकेला सुमारे २0 हजार चौ.मी. जमीन सोडून द्यावी लागली असती. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली पणजीत झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा कॅपिंगचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला असून ट्राउमेल ॲण्ड फीव या पारंपरिक पद्धतीने साठवून असलेल्या कचर्‍याचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या नव्या निर्णयामुळे गोवा सरकारला या प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त एक कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्याशिवाय भली मोठी जमीन मडगाव पालिकेच्या ताब्यात राहाणे शक्य होणार आहे. वास्तविक ज्या वेळी मडगाव पालिकेने सोनसड्याच्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे ठरविले होते. त्या वेळी अस्तित्वात असलेल्या कचर्‍याच्या राशीवर प्रक्रिया करण्याची अट त्यात घातली होती. सोशिएदाद फोमेन्तो या आस्थापनाने ती मान्यही केली होती. मात्र या कचर्‍याच्या राशीत आर्सेनिक व जस्तासारखे अपायकारक असे जड धातू सापडल्याने या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी फोमेन्तोने नाकारली होती. त्यानंतर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कचरा तज्ज्ञ डॉ. अस्नानी यांच्याकडून सल्ला घेण्यात आला होता. त्या वेळी डॉ. अस्नानी यांनी हा सायन्टिफीक कॅपिंगचा पर्याय सुचविला होता. गोवा सरकारने या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. पण निधीच्या अभावामुळे हा प्रस्ताव पुढे नेणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे मडगावातील कचर्‍याचा डोंगर तसाच पडून राहिला होता. या खर्चिक प्रस्तावाला गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाकडूनही विरोध करण्यात आला होता. मंडळाचे अध्यक्ष जुजे मान्यूएल नोरोन्हा यांनी अशाप्रकारचे कॅपिंग करणे शास्त्रीय बैठकीत बसणे शक्य नाही असे सूचित केले होते. नोरोन्हा यांच्या मताप्रमाणे अशा कॅपिंगसाठी तळाची जमीन शास्त्रोक्त पद्धतीने तयार करून घेणे आवश्यक असते, ज्यामुळे आत गाडलेल्या कचर्‍याचे पाणी जमिनीत झिरपण्याला प्रतिबंध होऊ शकेल. नोरोन्हा यांच्या मताप्रमाणे सोनसडोवर अशी व्यवस्था करणे अगदी अशक्य होते. या कचर्‍यात आर्सेनिक व जस्ताचे अंश सापडले असल्याचा दावा केला गेला असला तरी हे प्रमाण फारसे मोठे नाही असाही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा आहे. मंडळाच्या दाव्याप्रमाणे हा कचरा पारंपरिकरित्या गाळून ही समस्या मिटविणे शक्य आहे आणि त्यासाठी ७0 लाख ते एक कोटी रुपये एवढाच खर्च येऊ शकतो. तसे पाहिल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणलेला हा पर्याय कमी खर्चाचा तर आहेच त्याशिवाय सुटसुटीत असा आहे. ही पद्धत योग्यरित्या राबविल्यास मडगावात साठलेला कचराही नाहीसा होऊ शकतो. पण ही प्रक्रिया खरेच सुरू होईल का? याबाबत मात्र मडगावकर अजूनही साशंक आहेत. ही पद्धत सुरू केल्यास नेमक्या कोणत्या कालावधीत हा कचर्‍याचा डोंगर नाहीसा होईल याबाबत अजूनही स्पष्टता नाही. ही पद्धत योग्य नसल्याचे कालांतराने लक्षात आल्यास त्याला दुसरा पर्याय काय याबद्दलही अजून स्पष्टता नाही. आजपर्यंत मडगावकरांनी या सोनसड्यावरील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रकल्प मडगावात आल्याचे पाहिले, पण अजूनही कचर्‍याच्या राशी तशाच पडून आहेत. या पूर्वीच्या प्रकल्पामुळे मडगावकरांचे ओठ पोळले आहेत त्यामुळे आता पुढची प्रत्येक गोष्ट फुंकूनच प्यावी लागणार आहे.