शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

्न्न्नगगनगिरी आश्रमातर्फे अन्नछत्र

By admin | Updated: July 29, 2015 01:18 IST

त्र्यंबकेश्वर : येथील बसस्थानकाशेजारी वसलेल्या स्वामी गगनगिरी महाराज आश्रमातर्फे १३ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत जवळजवळ सव्वा महिना विविध धार्मिक कार्यक्रम व अखंड अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाचे व्यवस्थापक महंत प्रकाशगिरी यांनी दिली.

त्र्यंबकेश्वर : येथील बसस्थानकाशेजारी वसलेल्या स्वामी गगनगिरी महाराज आश्रमातर्फे १३ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत जवळजवळ सव्वा महिना विविध धार्मिक कार्यक्रम व अखंड अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाचे व्यवस्थापक महंत प्रकाशगिरी यांनी दिली.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, सकाळी चहा, नास्ता, ११ वाजता भोजन असे नियोजन असून, ११ वाजेपासून सुरू झालेला भोजन समारंभ दुपारपर्यंत सुरू राहाणार आहे. सायंकाळी ९ ते ११ या वेळेत रात्रीचे भोजन दिले जाईल. या आश्रमातर्फे या अन्नछत्रातून दर दिवशी ४ ते ५ हजार भाविक, साधू-महंत, शासकीय कर्मचारी भोजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत. आश्रमातर्फे दोन ठिकाणी स्वतंत्र पाकशाळा असणारे दोन अन्नछत्र चालणार असून, यासाठी २ ते अडीच हजार लोकांची टीम (स्वयंपाकी, मदतनीस, स्वयंसेवक) कार्यरत आहेत.आश्रमातर्फे अन्न छत्राबरोबरच दररोज पूजापाठ, होमहवन, कीर्तन, भजन आदि धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू राहाणार आहेत. या शिवाय आश्रमाच्या सभागृहातच आरोग्य शिबिरामार्फत अखंड वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आयुर्वेदिक व ॲलोपॅथीअसे ३ ते ५ डॉक्टर्स व पारिचारिका येथे कार्यरत राहाणार आहेत. रुग्णांची तपासणी करून औषधे दिली जाणार आहेत.आश्रमाला या कालावधीत मंत्री, उद्योजक, साधुसंत, शासकीय, प्रशासकीय प्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने भेट देणार असून, त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)----