अण्णा-भाऊ सूतगिरणी कर्मचार्यांना ४५ लाखांची पगारवाढ
By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST
अशोक चराटी यांची माहिती
अण्णा-भाऊ सूतगिरणी कर्मचार्यांना ४५ लाखांची पगारवाढ
अशोक चराटी यांची माहितीआजरा : १ मे २०१४ पासून आजरा येथील अण्णा-भाऊ सह. सूतगिरणीच्या कर्मचार्यांना घसघशीत ४५ लाख रुपयांची पगारवाढ करण्यात आली असल्याची माहिती राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक अशोक चराटी यांनी दिली.सूतगिरणीतर्फे कामगार-कर्मचारी यांच्याकरिता आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी होत्या.आजरा सूतगिरणीतर्फे सूतगिरणी परिवारातील सदस्यांच्या कल्याणार्थ विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्यदायी जीवन विमा योजनेच्या कार्डांचे कामगारांना वाटप करण्यात आले. कामगार सोसायटीच्या कर्जाच्या माध्यमातून फ्रीज वितरण, कामगार कल्याण योजनेतून कामगारांच्या मुलांना शिष्यृवत्ती वाटप करण्यात आली.याप्रसंगी सूतगिरणीचे सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते. सचिन सटाले यांनी सूत्रसंचालन केले. प्रॉडक्शन मॅनेजर अमोल वाघ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)