शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा पुन्हा रामलीलावर, दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:53 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.

- विकास खाडे/विनोद गोळे

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.राजघाटवर महात्मा गांधीजींच्या, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीचे दर्शन घेऊ न अण्णा रामलीला मैदानावर आले. राजस्थानी शेतकºयांनी सादर केलेल्या क्रांतिगीतानंतर अण्णांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून येणा-या शेतकरी संघटनांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.अण्णा म्हणाले की, शेतक-यांना उत्पादन खर्चाप्रमाणे भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या प्रश्नांबाबत मी ४३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मात्र, प्रश्न सुटत नाही. मी उपोषण करू नये, म्हणून मंत्री मला तीन-चार वेळा भेटून गेले. कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनीही दिले. मात्र, शेतकरी प्रतिनिधींशी मी यावर चर्चा करेन, तुम्हीही त्यांच्यासमोर येऊन बोला, असे कृषिमंत्र्यांना सांगितले आहे. याबाबतचा निर्णय होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील.कोणी मुख्यमंत्री तर कोणी मंत्री झालेत२0१२ मधील आंदोलनाच्या वेळी कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे हरयाणातील निवृत्त न्यायाधीश प्रीतमपाल अण्णांसोबत होते. आजही ते होते. त्यांचा उल्लेख करून अण्णा म्हणाले की, त्या आंदोलनाची टीम फुटली. कोणी मुख्यमंत्री, कोणी मंत्री झाले. सच्चे आंदोलक मात्र, आजही आमच्यासोबत आहेत. या आंदोलनातून कोणीही केजरीवाल, मंत्री, पक्ष तयार होणार नसून, शेतकºयांचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती आहे, असे अण्णांनी सांगितले.महाराष्ट्रासह देशभरातून मिळतोय पाठिंबाअण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली. अनेक संघटनांनी अण्णांचा फोटो सोबत घेऊन आंदोलन केले. महाष्ट्रातही मोदी सरकारचा निषेध करत, अण्णासमर्थक काही काळ रस्त्यावर घोषणाबाजी करताना दिसले.अण्णांना अश्रू अनावरभगतसिंग, सुखदेव, राजगुरूया क्रांतिकारकांनी आजच्या दिनी स्वत:ची आहुती दिली. देशात लोकशाही नांदावी, असे या क्रांतिकारकांचे स्वप्न होते, पण कोठे आहे स्वातंत्र्य व लोकशाही? गांधीजींचे स्मरण करून हजारे म्हणाले की, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. त्यासाठी स्वत:चा बळी द्यावा लागला, तरीचालेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता अण्णा हजारे महाराष्ट्र सदनमधून थेट राजघाटावर गेले. तेथे महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळाचे अण्णांनी दर्शन घेतले. या वेळी अण्णांना अश्रू अनावर झाले.सरकारने बसेस, रेल्वे रोखल्याया आंदोलनासाठी येणा-यांच्या बसगाड्या सरकाररोखत आहे. रेल्वेगाड्या रद्द करीत आहे. याला लोकशाही म्हणायचे का? तरीही लोक दिल्लीकडे येत आहेत. मी अधूनमधून बोलत राहीन. बोलण्यामुळे ऊर्जा कमी होत असली, तरी मला पर्वा नाही.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे