शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खडसेंचा धाक दाखवून १०८ हेक्टर जमीन हडपली अंजली दमानिया यांचा आरोप: लिमोझिनची ४८ तासात तपासणी होणार

By admin | Updated: May 26, 2016 20:56 IST

जळगाव : रावेर तालुक्यातील सावदा येथील भाजपाचा माजी नगरसेवक असलेल्या नंदकुमार पाटील व त्याचा भाऊ सुधाकर पाटील हे अवैध सावकारी करतात. त्यांनी मारहाण, धमक्या आणि महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाचा धाक दाखवून रावेर तालुक्यातील १८ शेतकर्‍यांची १०८ हेक्टर जमीन हडपली. महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात व जिल्‘ात हे जंगलराज आहे, असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी गुरुवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला.

जळगाव : रावेर तालुक्यातील सावदा येथील भाजपाचा माजी नगरसेवक असलेल्या नंदकुमार पाटील व त्याचा भाऊ सुधाकर पाटील हे अवैध सावकारी करतात. त्यांनी मारहाण, धमक्या आणि महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाचा धाक दाखवून रावेर तालुक्यातील १८ शेतकर्‍यांची १०८ हेक्टर जमीन हडपली. महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात व जिल्‘ात हे जंगलराज आहे, असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी गुरुवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला.
जिल्‘ात मुक्कामी असलेल्या दमानिया यांची रावेर तालुक्यातील १८ शेतकर्‍यांनी भेट घेतली व व्यथा मांडल्या. त्यानंतर दामानिया यांनी या शेतकर्‍यांना सावकाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.

दमानिया म्हणाल्या, तक्रारी केल्या तर पोलीस आणि सहायक निबंधक, उपनिबंधक, प्रशासन त्या बेदखल करतात. काम करू तर जीवन जगता येईल, अशी अवस्था या शेतकर्‍यांची झाली आहे. त्यांची लहान मुले हलाखीचे जीवन जगत आहेत. हाणामारी, दमदाटीमुळे एका शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर एका शेतकर्‍याच्या मुलाचा गळा चिरण्याचा प्रयत्नही झाला. जिल्हाधिकार्‍यांनी या शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून द्याव्यात, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल व चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करु असे आश्वासन दिले.

खडसे यांच्या जावयाची लिमोझीन जप्त का केली नाही?
तत्पूर्वी,दमानिया यांनी सकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) सुभाष वारे यांची भेट घेऊन महसूलमंत्री खडसे यांच्या जावयाची लिमोझीन जप्त का केली जात नाही, असा जाब त्यांना विचारला. ४८ तासात तपासणीचे आश्वासन देण्यात आले.

खडसेंच्या वाहनांची माहिती मागितली
आरटीओ यांनी आपल्याकडे लेखी तक्रार नसल्याचे कारण दिले असता दमानिया यांनी लागलीच दोन पानी तक्रार लिहून दिली. त्यात त्यांनी खडसे यांच्या जावयाची लिमोझीन ४८ तासात तपासणीसाठी बोलवा व कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केली. तसेच जिल्‘ात एमएच १९, १९१९ या क्रमांकाच्या किती चारचाकी आहेत, त्यांचे मालक कोण आदी माहितीही आरटीओ यांच्याकडे मागितली, पण आरटीओ यांनी ही माहिती कामाचा व्याप अधिक असल्याने एका दिवसात किंवा तत्काळ देता येणार नाही, असे सांगितले.

कारची तपासणी ४८ तासात
लिमोझीनची तपासणी ४८ तासात करू, गरज भासली तर या कारचे मालक असलेले खडसे यांचे जावई डॉ.प्रांजल खेवलकर यांनाही आरटीओ कार्यालयात बोलावू, असे स्पष्टीकरण आरटीओ सुभाष वारे यांनी यावेळी दिले.

लघु पाटबंधारे विभागातून घेतली माहिती
दमानिया यांनी दुपारी लघु पाटबंधारे विभागात जाऊन पद्मालय २ प्रकल्पाबाबतची माहिती घेतली. ती माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दमानिया या संबंधितांवर चिडल्या. सुमारे दीड तास त्यांनी लघु पाटबंधारे विभागात प्रकल्पाच्या फायलींद्वारे माहिती घेतली. त्यानंतर त्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्या. तेथून त्या ४ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडे रवाना झाल्या.