अनिल राऊत अटक-- जोड
By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST
अनिलचा या खुनात थेट सहभाग असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे . घटना घडल्यापासून अनिल फरार झाला होता. मंगळवारी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर तो आज पोलिसांना शरण गेला.
अनिल राऊत अटक-- जोड
अनिलचा या खुनात थेट सहभाग असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे . घटना घडल्यापासून अनिल फरार झाला होता. मंगळवारी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर तो आज पोलिसांना शरण गेला. सहायक पोलीस निरीक्षक चौगुले यांनी अनिल राऊत याला न्यायालयात हजर केले. आरोपीकडून गुन्ह्यातील भूखंडाचे दस्तऐवज जप्त करणे आहे. त्याने खुनाचा गुन्हा करण्यासाठी अन्य आरोपींना कशी मदत केली, याबाबत सखोल तपास करणे आहे, असे सरकार पक्षाने न्यायालयाला सांगून आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. आरोपीचे वकील ॲड. डी. एस. श्रीमाळी आणि ॲड. राम मासुरके यांनी आरोपी हा दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचे सांगून पोलीस कोठडी रिमांडचा विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.