पाचोर्यातील बांधकामाचा अहवाल मागविला जिल्हाधिकार्यांना आदेश : अनिल महाजन यांनी केली होती मागणी
By admin | Updated: November 7, 2015 00:05 IST
जळगाव : पाचोरा नगरपालिका अंतर्गत बांधण्यात आलेल्या राजीव गांधी टाऊन हॉल तोडून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामप्रकरणाचा अहवाल तत्काळ शासनाकडे पाठवावा या आशयाचे आदेश नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुहास ममदापुरकर यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले आहे.
पाचोर्यातील बांधकामाचा अहवाल मागविला जिल्हाधिकार्यांना आदेश : अनिल महाजन यांनी केली होती मागणी
जळगाव : पाचोरा नगरपालिका अंतर्गत बांधण्यात आलेल्या राजीव गांधी टाऊन हॉल तोडून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामप्रकरणाचा अहवाल तत्काळ शासनाकडे पाठवावा या आशयाचे आदेश नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुहास ममदापुरकर यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले आहे.पाचोरा नगरपालिकेतंर्गत राजीव गांधी टाऊन हॉलचे बांधकाम करण्यात आले होते. शासनाची कोणतीही परवानगी न घेता टाऊन हॉल तोडून त्या ठिकाणी मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याला सुरुवात झाली असून या गाळ्यांची विक्री व बुकींग सुरु झाली आहे. ३० वर्षाच्या करार पद्धतीने एका दुकानाची ५० ते ७५ लाखांची विक्री होत आहे. पाचोरा शहरातील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये १५० गाळ्यांचे बांधकाम सुरु आहे. या माध्यमातून व्यापार्यांची फसवणुक होण्याची शक्यता असून या कामाला स्थगिती देण्याबाबतचा तक्रार अर्ज अनिल महाजन यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिला होता.या तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुहास ममदापुरकर यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.