शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आयुक्तांच्या घरावर मोर्चा संत नामदेवनगरातील नागरिकांचा संताप : नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याच्या मागणीसाठी घातला गोंधळ

By admin | Updated: April 24, 2016 19:00 IST

जळगाव : जुन्या पाईपलाईनवर जास्त नळकनेक्शन झाल्याने पाणीपुरवठाच होत नसून त्याऐवजी नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या संत नामदेव नगरातील नागरिकांनी रविवारी मनपा आयुक्तांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानासमोर गोंधळ घालत निदर्शने केली. अखेर आयुक्तांनी काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत होऊन परतला.

जळगाव : जुन्या पाईपलाईनवर जास्त नळकनेक्शन झाल्याने पाणीपुरवठाच होत नसून त्याऐवजी नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या संत नामदेव नगरातील नागरिकांनी रविवारी मनपा आयुक्तांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानासमोर गोंधळ घालत निदर्शने केली. अखेर आयुक्तांनी काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत होऊन परतला.

पाच वर्षांपासून पाठपुरावा
इंद्रप्रस्थनगर भागातील संत नामदेवनगर परिसरात पूर्वी घरे कमी असल्याने मनपाने अडीच इंची पाईपलाईन टाकली होती. तेव्हा तेथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत होते. मात्र नंतर विस्तार झाल्याने घरे वाढली. नळकनेक्शनही वाढले. त्यातच जास्त पाणी मिळावे म्हणून नागरिकांकडून पाणी आल्यावर नळाला मोटारी लावणे सुरू झाले. त्यामुळे शेवटच्या भागात पाणी पोहोचत नसल्याने त्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नागरिकांनी गेल्या ५ वर्षांपासून मनपा पाणीपुरवठा विभाग व आयुक्तांकडे निवेदन देऊन व पाठपुरावा करूनही दखल घेतली गेलेली नाही.

घरासमोर घातला गोंधळ
रविवारी सकाळी या भागात पाणीपुरवठा होणार होता. मात्र पाणीच मिळत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट शिवाजीनगरातील मनपा आयुक्तांच्या निवासस्थानकडे मोर्चा वळविला. तेथे सुरक्षा रक्षकाने प्रवेशद्वारावर अडविल्यावर नागरिकांनी गोंधळ घातला. त्यामुळे अखेर आयुक्तांनी बाहेर येऊन नागरिकांशी चर्चा केली.
-------
काम मार्गी लावण्याचे आश्वासन
मनपा आयुक्त संजय कापडणीस हे मोर्चेकर्‍यांना सामोरे गेले. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना याबाबत विचारणा केली. मात्र खडके बाहेरगावी असल्याने त्यांनी शाखा अभियंता सुनील तायडे यांना तेथे पाठविले. त्यांनी त्याभागातील वस्ती वाढल्याने पाईपलाईनची क्षमता कमी पडत असल्याचे व नवीन पाईपलाईन आमदार निधीतून प्रस्तावित करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी नागरिकांना आपण स्वत: या विषयात लक्ष घालू असे आश्वासन दिले.