शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

सरकारविरुद्ध संताप

By admin | Updated: December 10, 2014 01:40 IST

महाराष्ट्रातील दुष्काळ व शेतक:यांच्या आत्महत्यांबाबत लोकसभेत मंगळवारी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला. राज्यातील खासदार लोकसभेत प्रश्न विचारत आहेत,

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील दुष्काळ व शेतक:यांच्या आत्महत्यांबाबत लोकसभेत मंगळवारी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला. राज्यातील खासदार लोकसभेत प्रश्न विचारत आहेत, पण त्यावर सरकारकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. शून्य प्रहरातही हा विषय आला पण आर्थिक मदत न करता केवळ कागदी घोडे नाचवत केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विरोधकांनी केला. 
कृपाल तुमाने, नाना पटोले, हिना गावित, सुनील गायकवाड, रवीद्र गायकवाड, प्रतापराव जाधव, काँग्रेसचे अशोक चव्हाण, राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक यांनी यावर मंत्र्यांनी उत्तर द्यावे असा आग्रह मंगळवारी धरला. सायंकाळी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी उत्तर देण्यास प्रारंभ केला, तेव्हा ते 2क्क्8 पासूनच्या शेतक:यांच्या आत्महत्यांची संख्या सांगत होते. तेव्हा अशोक चव्हाण यांनी संख्या आम्हाला माहीत आहे, सरकार शेतक:यांच्या कुटुंबाला कशी मदत करणार आहे, ते सांगा असे म्हटले. त्यावर सिंह यांनी आघाडीच्या काळात आत्महत्या केलेल्या शेतक:यांची संख्या आतापेक्षा अधिक होती, असे सांगून त्या वर्षांतील शेतक:यांच्या एकूण आत्महत्या व शेतीच्या कारणाने झालेल्या आत्महत्यांचे वर्गीकरण केले. तेम्हणाले,2क्क्8 एकूण 38क्2 एकूण आत्महत्यांपैकी 1क्94 शेतीच्या कारणांनी झाल्या. 2क्13 मधील 3145 पैकी 4क्3 शेतीच्या कारणांनी,2क्13 मध्ये 3686 पैकी 1क्42 शेतीच्या कारणांनी झाल्या. यंदा आतार्पयत 422 आत्महत्या झाल्या आहेत. मृत्यूची कारणो कोणतीही असली तरी सरकारला चिंता असून, मजबुतीने या संकटाचा आपण सामना करू, असे त्यांनी म्हणताच, सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपाय सरकारने शोधले पाहिजेत. महाराष्ट्राला मदतीचे पॅकेज कधी, किती देणार ते सांगा. आत्महत्यांची ही आकडेवारी सांगणो म्हणजे शेतक:यांची चेष्टा आहे, असे त्यांनी म्हणताच, कृषिमंत्री सिंह म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत संख्या सांगितली जात होती. आपण गंभीर असून, पूर्ण दिवसभर यावर चर्चा करू. 
सरकारने राज्यात आढावा घेण्यासाठी एक पथक पाठविले आहे. त्यांचा अहवाल 15 तारखेला येईल, त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट होईल असे ते म्हणाले. मात्र त्यांच्या या उत्तरानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले. अशोक चव्हाण म्हणाले, दुष्काळाचा विषय अत्यंत गंभीर आहे, मदतीचे पॅकेज जाहीर न करता कागदी घोडे नाचवणो सुरू आहे.  बँकांच्या कर्जाने, बँकेच्या तगाद्याने त्याचे मन खच्ची होत आहे. रोज 2क् पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारने मृतांची संख्या सांगून आपले तुपले करू नये. तेव्हा,‘ ठोस आश्वासन देत नाही, ते सरकार शेतक:यांनी काय न्याय देणार.’ अशा घोषणा देत सर्व सदस्यांनी सभात्याग केला. सदस्य बाहेर पडत असताना, सांसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी,दुष्काळाचा विषय अत्यंत गंभीर असून विरोधकांचेही मत जाणून घेतले जाईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाठविलेला अहवाल सविस्तर आहे, त्यावर सरकार विचार करत असून, केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करून मदतीचा निर्णय घेऊ असे म्हटले, पण तोवर सदस्यांनी सभागृह सोडले होते. 
 
केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राबाबत कमालीची अनास्था आहे. ठोस आश्वासन नाही, निर्णय नाही, मदतीसाठी शब्दही नाही. उलट शेतक:यांची चेष्टा सुरू आहे.
- अशोक चव्हाण,  काँग्रेस खासदार
राज्याचा आढावा घेण्यासाठी पाठवलेल्या पथकांचा अहवाल आल्यावर सरकार मदत करेल, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्र राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावील  शेतक:यांना कजर्माफी द्या, असे मागणी आपण केली आहे.
- नाना पटोले, भाजपा खासदार
 
दूध, साखर, कापसाचे भाव पडले आहेत. कर्जामुळे शेतकरी कंगाल झाला आहे. त्यांना मदत कधी हा आमचा प्रश्न आहे. राज्याने 3924 कोटींच्या पॅकेजची मागमी केली आहे. त्यावर सरकार बोलत नाही. 
- सुप्रिया सुळे, 
राष्ट्रवादी खासदार
शेतक:यांना झळ बसत आहे, हे मान्य असून, जोवर तांत्रिक बाबी पूर्ण होत नाहीत तोवर आम्ही थांबू. विरोधकांचा बहिष्कार अयोग्य आहे.
- अरविंद सावंत,
प्रवक्ते, शिवसेना