शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र-ओडिशात अतिसतर्कतेचा इशारा

By admin | Updated: October 10, 2014 03:41 IST

१२ आॅक्टोबर रोजी आंध्रात दाखल होण्याची तसेच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नवी दिल्ली : एका रंगीत चिमणीच्या नावावरून हुडहुड हे नाव मिळालेले चक्रीवादळ ओडिशा व आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगाने आगेकूच करीत असून ते १२ आॅक्टोबर रोजी आंध्रात दाखल होण्याची तसेच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या निवेदनात, गुरुवारी सकाळी हे चक्रीवादळ गोपालपूरहून दक्षिणेकडे ७८० कि.मी. तर विशाखापट्टणमहून ७७० कि. मी. दक्षिण पूर्वेकडे केंद्रित होते. ते आता उत्तर पश्चिमेकडे सरकत असून येत्या १२ तासांत ते विक्राळ स्वरूप धारण करेल व २४ तासांत त्याचे हे भीषण स्वरूप अधिकच वाढेल आणि १२ आॅक्टोबर रोजी दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दाखल होईल असे सांगण्यात आलेआहे. अंदमान निकोबार बेटांवर या चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रतिकूल हवामानाचा पूर्व अंदाज नसल्याने या बेटांवर डी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. मात्र, आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात आणि ओडिशाच्या दक्षिण भागात ११ आॅक्टोबरच्या संध्याकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची तर काही भागात भीषण वृष्टीची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे रस्ते व रेल्वे वाहतूक, वीज व संपर्क यंत्रणा प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.केंद्रानेही केली तयारीयेत्या दोन-तीन दिवसांत आंध्र व ओडिशाच्या किनारपट्टीवर येऊन आदळणाऱ्या हुडहुड या चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रबंधन समितीची बैठक गुरुवारी दिल्लीत घेण्यात आली. या बैठकीत या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीची पाहणी करण्यात आली. मंत्रिमडळाचे सचिव ए.के. सेठ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत राज्याच्या सर्व मुख्य सचिव व विभागांना चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामानखात्याच्या अंदाजानुसार हे वादळ १४० कि.मी. या वेगाने पुढे सरकत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)