शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

... अन् पत्नीनं पतीवर झाडल्या लागोपाठ तीन गोळ्या

By admin | Updated: May 6, 2017 11:49 IST

एका महिलेनं चालत्या कारमध्ये आपल्या पतीवर तीन गोळ्या झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 6 - एका महिलेनं चालत्या कारमध्ये आपल्या पतीवर तीन गोळ्या झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.  मात्र या हल्ल्यातून स्वतःची कशीबशी सुटका करत तो गाडीतून बाहेर आला. यानंतर तो बीएमटीसीच्या बसमध्ये चढला. पण इथेही महिलेने त्याचा पाठलाग करत बस गाठलीच व बसमध्येही त्याच्यावर हल्ला केला.
 
यावेळी बसमधील प्रवाशांनी मध्यस्थी करत महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती एक खासगी सिक्युरिटी फर्म चालवतो. व महिलेनं त्याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली पिस्तुल ही परवानाधारक असल्याचे पोलिसांनी सांगितेल. शुक्रवारी अंदाजे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
 
दरम्यान, पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पत्नीनं केलेल्या हल्ल्यात त्याच्या पोटाला गोळ्या लागल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. तपासणीदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न जवळपास 20 वर्षापूर्वी झाले आहे. दोघंही आपल्या गाडीतून तामिळनाडूतील होसूरहून परतत होते. यावेळी एक रेस्टॉरंटमध्ये दोघांनी मद्यप्राशन केले. 
 
पोलीस अधिका-याच्या माहितीनुसार, या पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव खटके उडत होते. या दोघांमध्ये वाद सुरू असताना पतीनं हात उगारल्याने आरोपी पत्नीनं रागाच्या भरात त्याच्यावर पिस्तुल ताणली आणि लागोपाठ तीन गोळ्या त्याच्या अंगावर झाडल्या.