शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आनंदीबेन पटेल गमावणार गुजरातचे मुख्यमंत्रीपद?

By admin | Updated: May 16, 2016 17:31 IST

गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी निवडणूकीपुर्वी भाजपा आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी करुन त्यांच्या जागी नवा चेहरा घेऊन येणार असल्याच्या बातम्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

गांधीनगर, दि. १६ -  आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षातील ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून भाजपाला या राज्यातील सत्ता गमावणे परवणार नाही. त्यामुळे आनंदीबेन पटेल यांना हटवून  त्यांच्या जागी नवा चेहरा आणण्याचा भाजपाचा विचार आहे. नितीन पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनू शकतात.

गुजरात भाजपामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहामध्ये भाजपा नेतृत्व चिंतीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांना पंजाबचे राज्यपाल बनवण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पटेल समुदायाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनानंतरच भाजपाचे मुख्य नेतृत्व राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याचा विचार करत होते. 

दरम्यान यापूर्वीच आनंदीबेन पटेल यांनी आगामी निवडणूकीत आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते. २२ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदीं विरोधकांना धूळ चारुन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर  गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांची नेमणूक झाली.