मुख्यमंत्रीपदासाठी आनंदीबेन यांचे नाव अग्रस्थानी
By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST
मोदींचा आज राजीनामा : उत्तराधिकार्याची निवड होणार
मुख्यमंत्रीपदासाठी आनंदीबेन यांचे नाव अग्रस्थानी
मोदींचा आज राजीनामा : उत्तराधिकार्याची निवड होणारअहमदाबाद : नरेंद्र मोदी यांच्या निकटस्थ महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांचे नाव गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी अग्रक्रमावर आहे. मोदी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या उत्तराधिकार्याची निवड करण्यासाठी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे.नव्या मुख्यमंत्री म्हणून 73 वर्षीय आनंदीबेन पटेल यांचे नाव 95 टक्के निश्चित असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी म्हटले. मात्र तरीही, मोदींचा वारसदार निवडण्यासाठी बुधवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही, असे भाजपाच्या एका नेत्याने म्हटले.भाजपाचे सरचिटणीस अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले असून त्यांच्यासह नितीन पटेल, सौरभ पटेल आणि सरचिटणीस भिकुभाई दालसानिया हेही शर्यतीत आहेत.गांधीनगरच्या टाऊन हॉलमध्ये होणार्या आमदारांच्या बैठकीला मोदी यांच्यासह केंद्रीय निरीक्षक थावरचंद गहलोत आणि राज्य प्रभारी ओम माथूर हे उपस्थित राहतील.--------------------------..तर पहिल्या महिला मुख्यमंत्रीआनंदीबेन पटेल यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यास त्या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. आनंदीबेन याआधी केशुभाई पटेल यांच्या सरकारमध्येही मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूल आणि नगरविकास खाते सांभाळले आहे. आनंदीबेन यांनी शिक्षिकेची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला होता.------------------------एका तपानंतर मोदींचा राजीनामा..तब्बल 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर मोदी बुधवारी राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडे राजीनामा सादर करतील. त्यांना निरोप देण्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ते दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे भाजपाचे प्रवक्ते हर्षद पटेल यांनी सांगितले.