शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अनंतकुमार हेगडेंच्या माफीमुळे वाद निवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:17 IST

नवी दिल्ली : घटना बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी लोकसभेत गुरुवारी माफी मागितल्यानंतर निवळला. आपल्या वक्तव्याला चुकीचे स्वरूप दिले गेल्याचा दावाही त्यांनी केला.

नवी दिल्ली : घटना बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी लोकसभेत गुरुवारी माफी मागितल्यानंतर निवळला. आपल्या वक्तव्याला चुकीचे स्वरूप दिले गेल्याचा दावाही त्यांनी केला.‘‘माझे शब्द विचित्र वळण देऊन सादर केले गेले. मी तसे काही बोललोच नव्हतो. तरीही जर कोणी दुखावले गेले असेल तर मी त्या सदस्यांची क्षमा मागतो’’, असे हेगडे म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास संपताना अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हेगडे यांना तुमच्या विधानांमुळे जर कोणी दुखावले गेले असेल तर त्यांची माफी मागा, असे आवाहन केले होते. जीवनात असे होते की जे आम्ही म्हणालो ते बरोबर होते, असे वाटते परंतु त्यामुळे इतर अजूनही दुखावले जाऊ शकतात, असे महाजन म्हणाल्या.तत्पूर्वी, हेगडे म्हणाले की, घटना माझ्यासाठी सर्वोच्च असून एक नागरिक या नात्याने मी कधीही त्याविरोधात जाऊ शकत नाही. घटना, संसद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला परम आदर आहे. हेगडे यांच्या खुलाशाला काँग्रेसचे सभागृहातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतल्यावर हेगडे म्हणाले होते की, माझ्या वक्तव्यांनी जर कोणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागायला तयार आहे.