शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विश्लेषण

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

महाजन गटाने उज्ज्वला मच्िंछद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे आणले. उज्ज्वला पाटील यांचे पती मच्िंछद्र पाटील हे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात दाखल झाले होते. मुक्ताईनगरातच पाटील यांचा प्रवेश सोहळा २०१४ मध्ये झाला होता. या स्थितीत उज्ज्वला पाटील यांच्या नावाला भाजपातील एका गटाकडून फारसा विरोध झाला नाही. त्यांच्या नावावर शेवटी एकमत झाले. दुसर्‍या बाजूला खडसे समर्थक नंदकिशोर महाजन यांना उपाध्यक्षपद मिळाल्याने खडसे गटाची नाराजी काहीशी दूर करण्याचा प्रयत्नही झाला आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात नंदकिशोर महाजन व त्यांचे समर्थक, निकटवर्तीय यांची खडसे यांना बर्‍यापैकी मदत होते. पुढील काळात नंदकिशोर महाजन यांच्या तांदलवाडी गावासह निंबोल, विटवा आदी मुक्ताईनगर मतदारसंघात असलेल्या भागात खडस्

महाजन गटाने उज्ज्वला मच्िंछद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे आणले. उज्ज्वला पाटील यांचे पती मच्िंछद्र पाटील हे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात दाखल झाले होते. मुक्ताईनगरातच पाटील यांचा प्रवेश सोहळा २०१४ मध्ये झाला होता. या स्थितीत उज्ज्वला पाटील यांच्या नावाला भाजपातील एका गटाकडून फारसा विरोध झाला नाही. त्यांच्या नावावर शेवटी एकमत झाले. दुसर्‍या बाजूला खडसे समर्थक नंदकिशोर महाजन यांना उपाध्यक्षपद मिळाल्याने खडसे गटाची नाराजी काहीशी दूर करण्याचा प्रयत्नही झाला आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात नंदकिशोर महाजन व त्यांचे समर्थक, निकटवर्तीय यांची खडसे यांना बर्‍यापैकी मदत होते. पुढील काळात नंदकिशोर महाजन यांच्या तांदलवाडी गावासह निंबोल, विटवा आदी मुक्ताईनगर मतदारसंघात असलेल्या भागात खडसे यांची पकड आणखी मजबूत होईल. तसेच सेनेचा या भागातील शिरकाव तेवढा त्रासदायक राहणार नाही, हेदेखील मुद्दे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेसोबत सत्तास्थापनेचा प्रयत्न केला, पण राष्ट्रवादीचे तीन सदस्य नेत्यांच्या संपर्कात अखेरपर्यंत नव्हते. यातील एक सदस्य माजी आमदार अरूण पाटील यांच्या धामोडीमधील आहे. तर दुसर्‍या सदस्य माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे समर्थक कै.संभाजी (भरत) पाटील यांच्या भाचेसून आहे. असे असताना हे सदस्य नेत्यांच्या संपर्कात कसे आले नाहीत... हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. अर्थातच राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीची हवाही जोरात वाहू लागल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले आहे.

सदस्यांमुळे काँग्रेसचे अस्तित्वाचा मुद्दाही चर्चेत
काँग्रेसचे जे सदस्य निवडून आले ते त्यांच्या व्यक्तीगत संपर्काच्या बळावर... त्यांच्या विजयात नेत्यांचा वाटा नाही, असे काँग्रेसच्या एका सदस्याने जाहीरपणे सांगितले होते. अशातच नगरपालिकांमध्ये काँग्रेस नगरसेवकांची संख्या ५४ वरून १४ वर घसरली. तर जि.प.तही १० वरून चार अशी संख्या झाली. हे अपयश जिल्हा प्रभारी व जिल्हा नेतृत्वाचा असल्याची टिका आता होऊ लागली असून, काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक, ओबीसींची मोट बांधून तसे नेतृत्व देण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे.