(निनाद) ंआरक्षणप्रश्नी धनगर समाजाची दिशाभूल
By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST
धनगर आरक्षण कृती समितीचा आरोप : २१ जुलैला बारामती येथे प्रेरणादिन साजरा करणार
(निनाद) ंआरक्षणप्रश्नी धनगर समाजाची दिशाभूल
धनगर आरक्षण कृती समितीचा आरोप : २१ जुलैला बारामती येथे प्रेरणादिन साजरा करणारदौंड : केंद्रात आणि राज्यात भाजपा, तसेच मित्र पक्षांचे सरकार आहे. परंतु सत्ता येऊनदेखील वर्ष उलटले. मात्र, अद्याप धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. भाजपाचे सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने दौंड येथे पत्रकार परिषदेत करण्यात आला. दरम्यान, धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवार (दि.२१ ) प्रेरणादिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी बारामती येथे समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर आरक्षण कृती समितीचे पांडुरंग मेरगळ यांनी केले. भाजपा, शिवसेना याचबरोबरीने मित्र पक्षाने निवडणुकीच्या प्रचारात धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, या सरकारनेदेखील धनगर समाजाची दिशाभूल करण्याचे कामकाज केले आहे. तेव्हा धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर भाजपा आणि मित्र पक्षालादेखील त्याची किमत मोजावी लागेल. धनगर आरक्षणाची कायदेशीर बाजू मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाने मांडली असताना,, आरक्षणासाठी विलंब कशासाठी होत आहे. याचा उलघडा होत नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आंदोलनाचा लढा कायम सुरू राहील. धनगर आरक्षण अंमलबजावणी ही न्याय्य हक्काच्या संविधानाने दिलेली कायदेशीर प्रक्रिया आहे. परंतु केवळ याच विषयावर वर्षानुवर्षे सत्तेचे घोडे अडकून बसलेले आहे. अनेक राज्यांमध्ये धनगर याच नावाने एसटी आणि एसी प्रवर्गामध्ये जातीचे दाखले मिळत असताना मात्र पुरोगामी महाराष्ट्रात धनगर समाजावर अन्याय केला जात आहे. या वेळी दादासाहेब केसकर, बाळासाहेब तोंडे पाटील, मोहन पडवळकर, बाळासाहेब गरदरे, नागेश बेलुरकर उपस्थित होते. चौकट * चीतपट करायला वेळ लागणार नाहीधनगर आरक्षण कृती समितीचे पांडुरंग मेगरळ म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकारणाच्या तालमीतील तेल लावलेल्या पैलवानांना धनगर आरक्षण कृती समितीने चीतपट केले. तेव्हा याचा विचार सत्ताधार्यांनी करावा, वेळ आल्यास तुम्हाला चीतपट करायला वेळ लागणार नाही, असाही इशारा मेरगळ यांनी दिला.************