अमळनेरात कपाशी पीक विम्यापोटी सर्वाधिक लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 22:34 IST
हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून २०१५ मध्ये कपाशी पिकासंबंधी अमळनेर तालुक्याला सर्वाधिक १२ कोटी ७५ लाख रुपये रक्कम वितरित झाली आहे.
अमळनेरात कपाशी पीक विम्यापोटी सर्वाधिक लाभ
हवामानावर आधारित पीक विमा योजनेतून २०१५ मध्ये कपाशी पिकासंबंधी अमळनेर तालुक्याला सर्वाधिक १२ कोटी ७५ लाख रुपये रक्कम वितरित झाली आहे. पारोळा, जामनेर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी आठ कोटी ३४ लाख, सहा कोटी ८६ लाख रक्कम वितरित झाली. जिल्हाभरातील ७६ हजार ६९० शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झाले होते. एक लाख सहा हजार १८९ हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण जिल्हाभरात घेण्यात आले होते. जिल्हाभरात एकूण ५९ कोटी १६ लाख दोन हजार रुपये रक्कम कपाशी पीक विमा योजनेतून लाभार्थी शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली. कपाशीबाबत पीक विमा योजनेतून दिलेल्या रकमेची माहिती(रक्कम लाखात)जळगाव- १९८.८भुसावळ- १५०.८बोदवड- १५०.८यावल- १२४.१रावेर- ११५.३मुक्ताईनगर- ४८६.१अमळनेर- १२७५.४धरणगाव- ५८.३चोपडा- ८२१.१एरंडोल- २२२.०पारोळा- ८३४.६पाचोरा- ४२८.७चाळीसगाव- २५५.०भडगाव- १०९.०जामनेर- ६८६.३