शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्यांमध्ये मातोश्रीवर हमरीतुमरी

By admin | Updated: September 25, 2014 04:15 IST

अकोला येथील शिवसेनेचे नेते मातोश्रीबाहेर बुधवारी रात्री हमरीतुमरीवर आले. नेत्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले

मुंबई : अकोला येथील शिवसेनेचे नेते मातोश्रीबाहेर बुधवारी रात्री हमरीतुमरीवर आले. नेत्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. रात्री उशिरा आ. गोपीकिसन बाजोरिया यांना अकोला पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे हे अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारीचे दावेदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य ज्योत्स्ना चौरे यांना उमेदवारी दिली जात असल्याचे समजल्यानंतर गावंडे यांच्यासह इतर सगळे दावेदार अस्वस्थ झाले आणि त्यांनी रात्री मातोश्री गाठली. चौरे यांना कोणत्याही परिस्थितीत तिकीट देऊ नका, असे त्यांचे म्हणणे होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. गावंडे, आ. गोपीकिसन बाजोरिया, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर आदींनी विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि रावते यांची भेट घेतली. चौरे यांच्या उमेदवारीला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या भेटीनंतर रात्री १०.१५च्या सुमारास हे नेते मातोश्रीबाहेर आले. गेटवरच गावंडे आणि पिंजरकर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पिंजरकर आपल्या उमेदवारीला विरोध करत असल्याचा समज झालेले गावंडे यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. गावंडे त्यांच्या अंगावर धावून जात असताना त्यांचे पुत्र संग्राम यांनी वडिलांना बाजूला नेले. बाजोरिया आणि इतरांनी पिंजरकर यांना दुसरीकडे नेले.