चेन्नई : तामिळी जनतेला योग्य दर्जाची व वाजवी किमतीची औषधे मिळावीत यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चेन्नईत अम्मा मेडिकल शॉप या नावाच्या औषधांच्या 1क् दुकानांचे उद्घाटन आज केले.
चेन्नईसह इरोड, सालेम, चुडुलोरे, मदुराई, शिवगंगा व विरुधुनगर या जिल्ह्यांमधील औषधांच्या दुकानांचे उद्घाटन त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.
या औषधांच्या दुकानांकरिता एक कोटीचा खर्च आला असून येथे नागरिकांना योग्य दर्जाची व वाजवी किमतीची औषधे मिळतील असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
अम्मा मीठ, अम्मा मिनरल वॉटर, अम्मा कॅन्टीन्सच्या मालिकेतील ही अम्मा मेडिकल्स असून नागरिकांमध्ये जयललिता या अम्मा नावाने परिचित आहेत. (वृत्तसंस्था)