शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जया बच्चनला राजकारणात घेऊ नका अमिताभने दिला होता सल्ला

By admin | Updated: May 5, 2016 13:01 IST

काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी जया बच्चन यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी जया बच्चन यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.  पनामा पेपर लीक प्रकरणात अमिताभ यांचे नाव आले आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी ही विधाने केली. 
 
बच्चन कुटुंबातील सूनबाई ऐश्वर्या रायने मला नेहमीच आदर दिला आहे. अभिषेकनेही माझ्या विरोधात कधी एक शब्दही उच्चारला नाही. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही माझा काही वाद नाही असे अमरसिंह यांनी सांगितले. मात्र जया बच्चन यांच्याबद्दल त्यांनी वेगळी मते व्यक्त केली. 
 
जया बच्चन यांना राजकारणात प्रवेश देऊ नको असे अमिताभ यांनी मला सांगितले होते. पण मी त्यांचा  हा महत्वाचा सल्ला ऐकला नाही असे अमरसिंह म्हणाले. जया बच्चन यांचा अस्थिर स्वभाव आणि सवयींमुळे त्यांना राजकारणात एंट्री न देण्याचा अमिताभ यांनी आपल्याला सल्ला दिला होता असे अमरसिंह यांनी सांगितले. 
 
पनामा प्रकरणाचे प्रश्न तुम्ही जाऊन अरुण जेटलींना विचारा. त्यांचे सरकार चौकशी करत आहे. आता मला बच्चन या नावाशिवाय समाधानाने जगू द्या असे अमरसिंह यांनी सांगितले. दशकभरापूर्वी अमरसिंह बच्चन कुटुंबाच्या अत्यंत जवळ होते. अमिताभ यांच्याबरोबर त्यांची घनिष्ट मैत्री होती. बच्चन कुटुंबातील प्रत्येक कौटुंबिक सोहळयात त्यांचा वावर असायचा. 
 
अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाच्यावेळी ही मैत्री अधिक प्रकर्षाने समोर आली होती. मुलायमसिंह यादव यांच्याबरोबर त्यांचे मतभेद झाल्यानंतर बच्चन कुटुंबाने अमरसिंह यांना साथ देण्याऐवजी मुलायमसिंह यादव यांना साथ दिली. त्यानंतर अमरसिंह बच्चन कुटुंबापासून दूर गेले.