शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दलालीवरुन अमित शहांचा राहुल गांधींवर सर्जिकल स्ट्राइक

By admin | Updated: October 7, 2016 13:48 IST

दलाली हा शब्द काँग्रेसला लागू पडतो. तो शब्द त्यांनी आपल्यापर्यंतच ठेवावा. आम्हाला तो शब्द जोडू नये.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - दलाली हा शब्द काँग्रेसला लागू पडतो. तो शब्द त्यांनी आपल्यापर्यंतच ठेवावा. आम्हाला तो शब्द जोडू नये अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या  वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला. भाजप सरकार जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे असे विधान राहुल यांनी केले होते. 
 
अमित शहा यांनी  राहुल यांच्या विधानाचा निषेध केला. राहुल यांनी सैन्याचा अपमान केलायं असे त्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे मागणा-या अरविंद केजरीवालांवरही त्यांनी तोफ डागली. पाकिस्तानातील परिस्थितीचे विश्लेषण केले असते तर पुरावे मागण्याची वेळ पडलीच नसती. 
 
सर्जिकल स्ट्राईक्सनंतर पाकिस्तानात जो गोंधळ आहे तो पुरेसा पुरावा आहे. स्ट्राईक्स झाले नाहीत मग पाकिस्तानने विशेष अधिवेशन का बोलावले ?, पाकिस्तानी पंतप्रधान इस्लामाबादमध्येच का थांबून आहेत ? हे चित्र परिस्थिती स्पष्ट करायला पुरेसे आहे असे अमित शहा यांनी सांगितले. 
 
स्ट्राईक्सचे आम्ही राजकारण केले नाही असेही शहा यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण देश, सरकार आणि भाजप लष्कराच्या पाठिशी आहे. आमचा लष्कराच्या गोळीवर विश्वास आहे. राजकीय विधानांवर नाही असे अमित शहा यांनी सांगितले. काही लोकांनी सैन्याचाच नव्हे तर, देशासाठी शहीद झालेल्यांचाही अपमान केला असे शहा यांनी सांगितले. 
 
सरकारने स्ट्राईक्सचे राजकारण होऊ नये याची काळजी घेतली. पत्रकार परिषदही डीजीएमओंनी घेतली होती असे अमित शहा यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर प्रसारमाध्यांनी बजावलेल्या भूमिकेचेही अमित शहा यांनी कौतुक केले. 
 
 
काय म्हटले अमित शहांनी पत्रकारपरिषदेत 
पाकिस्तानातील परिस्थितीचा विश्लेषण केलं असत तर तुम्हाला पुरावे मागण्याची गरज पडली नसती - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
भाजप आणि देशाला सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईक्सचा अभिमान आहे - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
आमच सरकार दृढ राजकीय इच्छाशक्तीसह सैन्याच्या मागे ठामपणे उभे आहे - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
मौत के सौदागर या शब्दप्रयोगानंतर गुजरातमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
राहुल गांधींच्या वक्तव्यातून त्यांची मानसिकता दिसते, त्यांनी जवानांचा अपमान केला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
 दलाली शब्द काँग्रेसमध्ये भिनलाय - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
राहुल गांधींचा शब्दप्रयोग हा सैन्याच्या शौर्यचा अपमान - - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
अमित शहांची सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे मागणा-या अरविंद केजरीवालांवर टीका.
सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल शंका घेऊन, काहीजणांनी शहीदांचा, सैन्याचा अपमान केला- अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल शंका निर्माण केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी चांगले काम करुन शंका दूर केली - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.
सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी चांगले काम केले, त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले असून, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला - अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष.