शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अमित शाह राज्यसभेवर, आनंदीबेन उपराष्ट्रपती?

By admin | Updated: April 1, 2017 01:22 IST

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे दोघे येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदासाठीची

हरीश गुप्ता / नवी दिल्लीभाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे दोघे येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक होताच आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत गुजरातेतील आमदार व खासदार मतदार असल्यामुळे ते पद सध्या सोडणार नाहीत. आमदारकी सोडण्याची दोघांचीही स्वत:ची कारणे आहेत. अमित शाह यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या आॅगस्टमध्ये तीन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ते राज्यसभेचे सदस्य होणे पसंत करतील. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (भाजपा), केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दिलीपभाई पंड्या हे गुजरातेतून खासदारपदाची सहा वर्षांची मुदत पूर्ण करीत आहेत. काँग्रेसचे अहमद पटेल यांचीही राज्यसभेतील मुदत पूर्ण होत आहे. राज्य विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ पाहता भाजपा आपल्या दोन्ही जागा कायम राखील व काँग्रेसला एक जागा सहजपणे ठेवता येईल. शाह यांचे राज्यसभेत येणे हा आधीच ठरलेला निर्णय आहे. एका गटाचे म्हणणे असे आहे की जी दुसऱ्या जागेवर आनंदीबेन पटेल यांना राज्यसभेवर पाठवून मंत्री केले जाईल. गोव्याचे मुख्यमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर यांच्या रिकाम्या होणाऱ्या जागेवर स्मृती इराणी यांची वर्णी लागू शकते. सध्या पर्रीकर हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले आहेत. परंतु राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे ती आनंदीबेन पटेल यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली जाऊ शकते या चर्चेने. भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाचा आपला स्वत:चा उमेदवार निवडून आणण्याइतके स्पष्ट बहुमत आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय नागरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत, माजी सरन्यायाधीस व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम व इतरांची नावे चर्चेत आहेत.