शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅम्बी व्हॅली’चा होणार लिलाव

By admin | Updated: April 18, 2017 05:32 IST

गुंतवणूकदारांचे देणे चुकते करण्यास सहारा उद्योगसमूहाच्या मालकीची पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ ही मालमत्ता लिलावात विकून

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे देणे चुकते करण्यास सहारा उद्योगसमूहाच्या मालकीची पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ ही मालमत्ता लिलावात विकून पैसे वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.सहाराने गुंतवणूकदारांचे १४ हजार कोटी रुपये अद्याप परत करायचे आहेत. त्यापैकी पाच हजार कोटी रुपये १७ एप्रिलपर्यंत ‘सेबी’कडे जमा न केल्यास अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारला जाईल, असे न्यायालयाने याआधी बजावले होते. सहाराने कबूल केल्याप्रमाणे पैसे जमा न केल्याने न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने लिलावाची कारवाई सुरु करण्याचा आदेश दिला.अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ कार्यालयामार्फत करण्यात येईल. सहाराच्या वकिलांनी अ‍ॅम्बी व्हॅलीसंबंधीची सर्व आवश्यक माहिती दोन दिवसांत ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ना द्यावी आणि त्या कार्यालयाने १० दिवसांत या मालमत्तेचे मूल्यांकन करून लिलावाची कारवाई कायद्यानुसार सुरू करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. गेल्या फेब्रुवारीत न्यायालयाने अ‍ॅम्बी व्हॅलीवर टांचही आणली होती.सहारा रिअल इस्टेट आणि सहारा हाऊसिंग या सहारा समूहातील दोन कंपन्यांनी बेकायदा योजना राबवून गोळा केलेले २५ हजार कोटी रुपये व्याजासह ‘सेबी’च्या माध्यमातून परत करावे, असा आदेश न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये दिला होता. तरीही पैसे दिले नाहीत म्हणून न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि दोन संचालकांना तुरुंगात टाकले. अजूनही सहाराने १४ हजार कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत. ‘अ‍ॅम्बी व्हॅली’चा लिलाव होऊ नये असे वाटत असेल, तर इतर मालमत्ता विकून पैसे जमा करा, असे वारंवार सांगून आणि त्यासाठी अनेक वेळा मुदत देऊनही सहाराने रक्कम भरली नाही त्यामुळे अखेरीस ‘अ‍ॅम्बी व्हॅली’चा लिलाव पुकारण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)