आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर उत्तर नागपुरातच
By admin | Updated: February 10, 2015 00:55 IST
आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर उत्तर नागपूरमध्येच
आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर उत्तर नागपुरातच
आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर उत्तर नागपूरमध्येच शिष्टमंडळ भेटले : पालकमंत्र्यांचे आश्वासन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर उत्तर नागपूरमधून कामठीमध्ये स्थलांतरित करण्याच्या मुद्यावर सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर संघर्ष समूहांतर्गत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रविभवन येथे घेराव घातला. यावेळी पालकमंत्र्यांनी हे सेंटर उत्तर नागपूरमध्येच राहील, असे आश्वासन दिले. तसेच यासंदर्भात जमिनीच्या आरक्षणाचा तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. या संदर्भातच जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक लावून तांत्रिक मुद्दा दूर करू. कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचे काम तातडीने सुरू करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. शिष्टमंडळात अमन कांबळे, प्रा. सरोज आगलावे, अजय गजभिये, प्रज्ञा सालवटकर, क्रांती आगलावे, डॉ. राजेंद्र फुले, संगीता वाळके, दिलीप अंबादे, डॉ. मिलिंद जीवने, हरीश सुखदेवे, आनंद कौशल, राजेश गोंडाणे, नितीन ताकसांडे, प्रफुल्ल भालेराव आदींसह मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी होते.