शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील अॅश ट्रेमुळे अमेझॉन पुन्हा वादात

By admin | Updated: June 7, 2017 10:34 IST

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन पुन्हा एकदा वादात आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.7- ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन पुन्हा एकदा वादात आली आहे. अमेझॉनचा हा नवा वाद एका अॅश ट्रेमुळे निर्माण झाला आहे. अमेझॉनवर विकायला ठेवलेला हा अॅश ट्रे अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील आहे. नग्नावस्थेतील महिलेची प्रतिकृती असलेलं डिझाइन या अॅश ट्रेचं बनविण्यात आलं आहे. अमेझॉनवर या वेबसाइटवर अशा प्रकारचं डिझाइन असलेले मेटल आणि चिकण माती असे दोन प्रकारातील अॅश ट्रे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी मेटलच्या ट्रेची किंमत तब्बल 4441 रूपये तर चिकण मातीच्या ट्रेची किंमत 299 रूपये आहे. अमेझॉनवरची ही वस्तू काही वेळातच सोशम मीडियावर व्हायरल झाली होती. अमेझॉन विरत असलेल्या या ट्रेवर बंदीची मागणीसुद्धा नेटीझन्सने केली आहे. 
 
 
 
 
 
सोशल मीडियावर या संदर्भातील तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.  फेसबुकवर गीता यथार्त या महिलेने अमेझॉनवर आक्षेप घेत पोस्ट शेअर केली आहे. "ज्या देशात दररोज प्रत्येक तासाला लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यत प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेने बघणारे पुरूष आहेत. जिथे प्रत्येक तासाला एक तरी बलात्काराची घटना ऐकु येते. मुलींवर क्रुरतेने अत्याचार करून त्यांना मारलं जातं, त्याच देशात अशा प्रकारचं बाजारीकरण बाढतं आहे.  बलात्कार करणाऱ्या पुरूषांना अमेझॉन गिफ्ट देतं आहे. पैसे कमवायची या पेक्षा वाईट पद्धत सुचली नाही का ? असा प्रश्न गीता या महिलेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. 
 
सोशल मीडियामधून टीकेची झोड उठू लागल्यावर अमेझॉनने त्या अॅश ट्रेला साइटवरून काढून टाकलं आहे. अमेझॉनकडून अशा प्रकारची चूक पहिल्यांदा झालेली नाही. याआधीसुद्धा एका वस्तूवरून खूप वाद झाला होता. तिरंग्याचं चित्र असलेला डोअर मॅट अमेझॉनने विकायला ठेवला होता. यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खडसावल्यानंकर अमेझॉनच्या कॅनडा वेबसाइटवरून त्या वस्तूला हटविण्यात आलं होतं. तसंच अमेझॉनकडून या वादासाठी माफी मागण्यात आली होती. तसंच महात्मा गांधी यांचा फोटो छापलेल्या चपला अमेझॉनने आणल्या होत्या. यावरून अमेझॉनवर टीका झाली होती.