शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार

By admin | Updated: July 10, 2017 23:17 IST

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 10 -  जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी आज अमरनाथ यात्रेकरूंना आपले लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले आहेत. मृत यात्रेकरू हे गुजरातमधील वलसाड येथील राहणारे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बालटाल येथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सात भाविक ठार झाले असून, १३ जण जखमी झाले आहे. दहशतवाद्यांनी रात्री आठच्या सुमारास हा हल्ला केला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. ही संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या अमरनाथ येथील यात्रेला २९ जूनपासून सुरुवात झाली होती.