शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू

By admin | Updated: June 17, 2017 00:34 IST

चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेस यावर्षी २९ जूनपासून प्रारंभ होत असून, यात्रेची नोंदणीही सुरू झाली आहे, अशी माहिती श्री अमरनाथ देवस्थान

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेस यावर्षी २९ जूनपासून प्रारंभ होत असून, यात्रेची नोंदणीही सुरू झाली आहे, अशी माहिती श्री अमरनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाने (एसएएसबी) दिली. यात्रा २९ जूनला सुरू होऊन ७ आॅगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी समाप्त होईल. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी एसएएसबीने देशभर व्यवस्था केली आहे. तीन बँकांच्या 433 शाखांत भाविक नोंदणी करू शकतात. पवित्र अमरनाथ गुहेतील हिम शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. बालटाल आणि चंदनवाडी या दोन्ही मार्गाने मंदिराकडे जाण्यासाठी बँका तसेच टपाल कार्यालयांद्वारे नोंदणी होते.7500यात्रेकरूंना गेल्यावर्षी प्रमाणेच दररोज पहलगाम आणि बालटाल मार्गे पवित्र अमरनाथ गुहेकडे रवाना केले जाईल.गेल्यावर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान काश्मीर खोऱ्यात हिंसाचार झाला होता. तथापि, त्याचा अमरनाथ यात्रेकरूंच्या उत्साहावर यावर्षी कोणताही परिणाम झालेला नाही.यंदा झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे बाबा बर्फानी (हिम शिवलिंग) आपल्या पूर्ण आकारात दर्शन देतील, असा भक्तांचा विश्वास आहे. यात्रेकरूंसाठी देण्यात आलेल्या सूचना... तंदुरुस्ती (मेडिकल फिटनेस) प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही भाविकाला यात्रा करता येणार नाही. १३ वर्षांहून कमी आणि ७५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना यात्रेसाठी मुभा दिली जाणार नाही.यात्रेसाठी 50 रुपये एवढे नोंदणी शुल्क आहे. श्री अमरनाथ विश्वस्त मंडळ यात्रेकरूंचा नि:शुल्क विमा काढणार असून त्यासाठी यात्रेकरूंना ‘अ’ अर्ज भरून द्यावा लागेल. नोंदणीची व्यवस्थायात्रेसाठी देशभर पंजाब नॅशनल बँकेच्या ३०७, जम्मू-काश्मीर बँकेच्या ८७ आणि यस बँकेच्या ४० शाखांत नोंदणी होईल. सर्व बँकांनी नोंदणी प्रक्रियेची तयारी केली असून अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.