शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट

By admin | Updated: June 6, 2017 08:58 IST

काश्मिरमध्ये सध्या सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा सैन्यदलासमोर अमरनाथ यात्रेचं आव्हान समोर उभं राहत आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 6- काश्मिरमध्ये सध्या सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा सैन्यदलासमोर अमरनाथ यात्रेचं आव्हान समोर उभं राहत आहे.  सध्यातरी अधिकृतपणे यात्रेच्या दरम्यान कोणताही धोका नसल्याचं बोललं जात आहे. पण जर सुरक्षा व्यवस्थेमध्ये जराही हलगर्जी झाली तर यात्रेवरसुद्धा दहशतवादी हल्ला होऊ शकतो , असं सुरक्षा दलाचं मत आहे. जम्मू-काश्मिर सरकारने अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गाला अतीसंवेदनशील घोषित केलं आहे. तसंच भाविकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशसुद्धा सरकारने सैन्य दलाला दिले आहेत. 
 
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मिर सरकारने महत्त्वाचे निर्देश काढले आहेत. लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 29 जूनपासून सुरू होणाऱ्या यात्रेच्या सुरक्षेची खात्री केली जाते आहे. तसंच गुप्तचर संस्था आणि एकिकृत मुख्यालयातून मिळणाऱे आदेश आणि माहिती याची चाचपणी करण्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे कुठल्याही संभाव्य दुर्घटनेला रोखता येइल. 
 
अमरनाथ यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी श्राइन बोर्डाकडून लाखो लोकांना निमंत्रण पाठविण्यात आलं आहे.आत्तापर्यंत दोन लाख लोकांची नोंदणी झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना सांभाळण्याचं आव्हान आता सैन्यदलासमोर आहे. याधी अनेक वेळा सैन्यदलाला धुत बनवत दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. 
 
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होते आहे. तर 7 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये तेरा वर्ष वयापेक्षा कमी आणि 75 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती सहभाग घेऊ शकणार नाही. तसंच गरोदर महिलांनासुद्धा यात्रेत सहभाग घेता येणार नाही. यंदाच्या यात्रेसाठी तब्बल 37 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. गेल्या यात्रेत भाविकांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं यंदा त्या गोष्टी घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. नोंदगी न करता यात्रेमध्ये भाविकांना सहभाग घेता येणार नाही.