शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ हल्ला: पहिली घोडचूक, भाविकांच्या बसचं रजिस्ट्रेशन नव्हतं

By admin | Updated: July 10, 2017 23:03 IST

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
अनंतनाग, दि. 10 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तसंच 13 जण जखमी झाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेच्या आधी 25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता. याशिवाय एक मोठी घोडचूक समोर आली आहे. गुजरातच्या ज्या बसवर दहशतवादी हल्ला झाला त्या बसची नोंदणी श्राइन बोर्डाकडे करण्यात आली नव्हती अशी माहिती समोर आली आहे.  
 
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू होण्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी  25 जून रोजी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट पोलीस प्रशासनाला दिला होता.अमरनाथ यात्रेवर हल्ला करून देशभरात सांप्रदायिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न दहशतवादी करू शकतात. तसंच पोलीस आणि अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर लगेचच गुप्तचर यंत्रणांनी तसा अलर्ट जारी केला होता.    
 (जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार)
(काश्मीरमध्ये तिस-या दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरूच)
(दार्जिलिंगमध्ये जाळपोळ; गोळीबारात तिघांचा मृत्यू)
अमरनाथ यात्रेवर यंदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेण्यात आली असून भाविकांच्या केसालाही धक्का लागणार नाही असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतरही हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.   
 
दहशतवाद्यांनी हा हल्ला रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास केला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे याच जिल्ह्यातील बांतिगू परिसरात पोलिसांच्या पथकावर सुद्धा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यात तीन जवान जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
 
यापुर्वी 27 जुलै 2000 रोजी अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला होता. त्यामध्ये 25 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तर 37 यात्रेकरू जखमी झाले होते.