शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

"कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुलाची ईडी चौकशी थांबवण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले’’

By बाळकृष्ण परब | Updated: December 14, 2020 15:37 IST

Amarinder Singh News : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत. तर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी मुलावरील ईडीची केस मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले, असा आरोप केजरीवाल यांनी केला.पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठेवलेले उपोषण हे नाटक असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार आरोप केले. ईडीकडील केस माफ व्हावी यासाठी अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारसोबत सेटिंग केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की, कॅप्टनजी मी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसोबत आहे. मी दिल्लीतील स्टेडियमना जेलमध्ये परिवर्तीत होऊ दिलं नाही. केंद्र सरकारसोबत लढलो आहे. मी शेतकऱ्यांचा सेवेकरी बनून त्यांची सेवा करत आहे. तुम्ही तर तुमच्या मुलावरील ईडीची केस माफ व्हावी यासाठी केंद्र सरकारसोबत सेटिंग केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन विकले? पण का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घोषित केला होता. तसेच नागरिकांनाही उपोषण करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. अरविंद केजरीवाल यांचे उपोषण म्हणजे नाटक आहे, असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला होता. तसेच अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले एक काम सांगा, असे आव्हानही अमरिंदर सिंग यांनी दिले आहे. दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही काम करण्याऐवजी केजरीवाल आणि त्यांचा पक्ष राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाबAAPआप