शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग सरकार सत्तेवर

By admin | Updated: March 17, 2017 00:47 IST

काँग्रेसला पंजाबमध्ये विजयपथावर नेणारे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी राज्याचे २६वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सोबत नवजोतसिंग सिद्धू व इतर आठ मंत्र्यांचाही शपथविधी झाला

चंदीगड : काँग्रेसला पंजाबमध्ये विजयपथावर नेणारे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी राज्याचे २६वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सोबत नवजोतसिंग सिद्धू व इतर आठ मंत्र्यांचाही शपथविधी झाला. पतियाळा राजघराण्याचे वंशज असलेले अमरिंदरसिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. माजी क्रिकेटपटू सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी अटकळ होती. तथापि, मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. अमरिंदर यांच्यानंतर ब्रह्म मोहिंद्रा यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर सिद्धूंना आमंत्रित करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असलेल्या या सोहळ्यात दोन महिला आमदारांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यपाल व्ही.पी. सिंग बदनोरे यांनी गोपनीयतेची शपथ दिली सिद्धूसह मनप्रीतसिंग बादल, साधुसिंग धरमसोट, तृप्त राजिंदरसिंग बाजवा, राणा गुरजितसिंग व चरणजितसिंग चन्नी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अरुणा चौधरी आणि रझिया सुल्ताना अशा ९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. (वृत्तसंस्था)अमरिंदर यांच्याकडे सामान्य प्रशासन, कार्मिक, गृह, न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्याकडे नसलेल्या खात्याचा कार्यभार राहील. मनप्रीत बादल पंजाबचे नवे अर्थमंत्री असतील. मोहिंद्रा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विधिमंडळ कामकाज, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण, सिद्धूंकडे स्थानिक स्वराज संस्था, पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहार ही खाती देण्यात आली आहेत.