शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

यावल, रावेरमध्ये जलपातळीत मोठी घट अमळनेरचा जलसाठा तीन मिटर घटला : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव : अत्यल्प पाऊस, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड या सार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.

जळगाव : अत्यल्प पाऊस, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड या सार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.
भूजल सर्वेक्षण विभाग कार्यालयामार्फत तालुकानिहाय विहिरींचे निरीक्षण करण्यात येत असते. सप्टंेबर महिन्यातील अहवालानंतर या कार्यालयाने जानेवारी महिन्याच्या अखेर प्रत्येक तालुक्यातील विहिरीचे निरीक्षण करून भूगर्भातील जलपातळीची मोजणी केली आहे.
अमळनेर, चाळीसगाव व धरणगावात धोक्याची घंटा
भूजल सर्वेक्षण विभागातर्फे अमळनेर तालुक्यातील १४, चाळीसगाव तालुक्यातील २१ व धरणगाव तालुक्यातील सात तर पारोळा तालुक्यातील १६ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या चारही तालुक्यांमध्ये अडीच ते तीन मीटरपर्यंत जलपातळीतील घट नोंदविण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मोजणीत बोदवड तालुक्यात सर्वाधिक अडीच मीटरने जलपातळीत घट झाल्याची नोंद होती. त्यापाठोपाठ अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात दीड मीटरने जलपातळीत घट झाली होती.

चोपडा, यावल व रावेरला मोठा फटका
४ सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे यावल, रावेर, चोपडा व भुसावळ तालुक्यांना दिलासा मिळाल्याने या तालुक्यातील जलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. पावणे तीन मिटरने यावल तालुक्यातील वाढ नोंदविण्यात होती. मात्र प्रचंड उपसा केल्यामुळे यावल तालुक्यात २.७७ मीटरने जलपातळीत घट झाली आहे. चोपडा तालुक्यात २.५१ मीटरने तर रावेर तालुक्यात १.१६ मीटरने भूगर्भातील जलपातळीत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने जलपातळीत घट होत आहे.
मुक्ताईनगर व भुसावळात अत्यल्प घट
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भूजलपातळीत घट होत असताना मुक्ताईनगर, भुसावळ व एरंडोल तालुक्यात काहीशी स्थिती चांगली आहे. भुसावळ तालुक्यात ०.८८, मुक्ताईनगर तालुक्यात ०.९६ तर एरंडोल तालुक्यात १.०७ मीटरने भूजलपातळीतील घट नोंदविली आहे.
४भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनुपमा पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हाभरातील १७८ विहिरींचे सर्वेक्षण केले. भूजलपातळीची मोजणी करताना जानेवारी २०११ व जानेवारी २०१६ या महिन्यातील भूजलपातळीचा तुलनात्मक अभ्यास करून तालुकानिहाय वाढीचा किंवा घट झाल्याचा अहवाल तयार केला आहे. पाच वर्षात सरासरी पाणी पातळीचीदेखील नोंद केली आहे.