शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वटहुकूम बारगळणार तरी भूसंपादनाचे लाभ कायम

By admin | Updated: August 28, 2015 23:47 IST

आधीच्या संपुआ सरकारने केलेल्या भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारने काढलेला आणि मोठया प्रतिष्ठेचा विषय बनविलेला भूसंपादन वटहुकूम संसदेकडून

नवी दिल्ली: आधीच्या संपुआ सरकारने केलेल्या भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारने काढलेला आणि मोठया प्रतिष्ठेचा विषय बनविलेला भूसंपादन वटहुकूम संसदेकडून कायद्यात रूपांतरित न झाल्याने येत्या सोमवारी ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात येईल.हा वटहुकूम गेले वर्षभर जिवंत ठेवला. आताही तोच वटहुकूम चौथ्यांदा काढण्याची भाषा सरकारकडून केली गेली होती. मात्र ‘जीएसटी’सह आर्थिक सुधारणांशी संबंधित अन्य विधेयके मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावता यावे यासाठी सरकारने पावसाळी अधिवेशन संस्थगित न करता प्रलंबित केले आहे. अशा परिस्थितीत संसदेचे अधिवेशन तांत्रिकदृष्ट्या अद्यापही सुरु असल्याने वटहुकूम काढणे राज्यघटनेला धरून होणार नाही, असा सल्ला अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी दिला. अशा परिस्थितीत या वटहुकुमानुसार ज्या १३ ठराविक कायद्यान्वये ज्यांच्या जमिनींचे संपादन केले गेले त्यांना वाढीव भरपाई व प्रकल्पग्रस्तांना नोकरी यासारख्या लाबांपासून वंचित व्हावे लागू नये यासाठी वटहुकुमानुसार आतापर्यंत झालेल्या भूसंपादनसाठी हे लाभ यापुढेही सुरु ठेवण्यासाठी वैधानिक आदेश काढण्याचा मार्ग सरकारने स्वीकारला आहे.