शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देश होरपळला तरी मोदींना चिंता पंतप्रधानपदाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:50 IST

राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे

शीलेश शर्मा, नितीन अग्रवाल।नवी दिल्ली : भले देश होरपळू दे, मुलींवर बलात्कार होऊदेत, दलित व अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत असेल पण नरेंद्र मोदी यांचे सारे लक्ष पुन्हा पंतप्रधान बनण्याकडेच लागलेले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ‘राज्यघटना (संविधान) बचाव' या मोहिमेचा प्रारंभ करताना ते म्हणाले की, राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे. मात्र या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाची गळचेपी करत असून संसदेतील कामकाजही बंद पाडले आहे.देशातील विविध यंत्रणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा भरणा केला जात आहे असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, दलितांनी केलेल्या स्वच्छताकार्यामध्ये पंतप्रधानांना आध्यात्मिकतेचे दर्शन झाले. मात्र दलित, तसेच समाजातील दुर्बल घटक, महिला यांच्याविषयी पंतप्रधानांच्या मनात अजिबात कणव नसल्याचे देशाने पाहिले आहे.

ही कुटुंब वाचवण्याची मोहीम : अमित शहा‘संविधान बचाओ' मोहीम देशाला नव्हे तर स्वत:च्या कुटुंबाला वाचविण्यासाठी आहे अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. घटनेची मूल्ये काँग्रेसनेच पायदळी तुडवली आहेत. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात काँग्रेसनेच पुढाकार घेतला. देशातील प्रत्येक यंत्रणेला दुर्बल करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. राज्यघटनेच्या रक्षणाची भाषा करणाºया गांधी घराण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केला होता. तीच परंपरा आता राहुल गांधी चालवत आहेत असेही अमित शहा म्हणाले.भाजपपासून बेटी ‘बचाओ'राहुल गांधी म्हणाले की, रोजगाराच्या संधी तसेच अन्य गोष्टींबाबत गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी जनतेला भरभरून आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाहीत. आता येत्या लोकसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोदी नवीन आश्वासनांचा मारा करतील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशी घोषणा मोदींनी दिली होती. पण भाजपा व त्याच्या नेत्यांपासूनच ‘बेटी बचाओ' म्हणण्याची वेळआहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी