शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राममध्ये आखाडयांना जागा वाटप सुरू

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

सिंहस्थ कुंभमेळा : दोन दिवसात होणार सर्व जागांचे वाटप

सिंहस्थ कुंभमेळा : दोन दिवसात होणार सर्व जागांचे वाटपपंचवटी : जागा वाटपावरून सुरू असलेला साधूमहंतांतील वाद विवाद मिटल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच तपोवन साधूग्राममध्ये आखाडे तसेच खालशांना जागा वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. दुपारपर्यंत जवळपास दिडशेहून अधिक जागांचे वाटप प्रशासन व आखाडयांकडून करण्यात आले आहे.साधूग्राममधील सेक्टर २ अे मध्ये सकाळपासूनच जागा वाटप सुरू असल्याने विविध आखाडे तसेच खालशाच्या साधू महंतांनी मोठी गर्दी केलेली होती. जागांचे वाटप केल्यानंतर मार्किंग करून दिल्यानंतर तत्काळ त्या रिकाम्या जागेभोवती बांबू लाऊन सुतळीने जागेला कुंपण घालण्याचे काम सुरू होते. आखाडे तसेच काही खालशांना जागा वाटप करण्याचे काम बाकी असुन येत्या दोन दिवसात सर्वच जागांचे वाटप पूर्ण केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या आखाडयांना जागा वाटप करण्यात आल्या त्या आखाडेधारकांनी लागलीच त्या जागेभोवती आपापल्या आखाडयांचे फलक लावण्याचे काम केले आहे. जागावाटपा दरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद विवाद झाला नाही मात्र जवळच्या खालशांशेजारी एकाला एक लागूनच जागा दिल्यास आम्ही सर्व जवळचे साधूमहंत एकत्र राहू असे म्हणत काही खालसेधारकांनी एकाला एक लागून जागा दयाव्यात अशी मागणी यावेळी केली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जागावाटपाचे काम करण्यात आले त्यानंतर सर्व साधूमहंत भोजनासाठी गेले तर दुपारी चार वाजेनंतर पुन्हा जागा वाटप करण्याचे काम करण्यात आल्याचे दिगंबर आखाडयाचे नाशिक सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थापक महंत विश्वंभरदास महाराज यांनी सांगितले. (वार्ताहर) इन्फो बॉक्ससेक्टर दोन मध्ये राखीव प्लॉटसाधूग्राममध्ये जागा वाटप करतांना सेक्टर दोन मध्ये काही रिकामे प्लॉट राखीव ठेवण्यात आले आहे. आपतकालीन परिस्थितीत हे रिकामे प्लॉट उपयोगात येणार असल्याने ते राखीव ठेवणे गरजेचे आहे. राखीव जागा आखाडयांना दिली आणि नंतर पुन्हा ती जागा खाली करण्यास सांगितले तर वाद होण्याची शक्यता आहे हे वाद होऊ नये म्हणून अगोदर पासूनच काही प्लॉट राखीव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.