शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व व्यवहार होतील बोटांच्या ठशांनी!

By admin | Updated: January 9, 2017 04:08 IST

नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम

बंगळुरु : नोटाबंदीनंतर रोखीऐवजी डिजिटल व्यवहारांना सरकार मोठी चालना देत असतानाच सन २०२० पर्यंत देशात सर्व प्रकारची डेबिट व क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस यंत्रे कालबाह्य ठरून केवळ बोटांच्या ठशांनी पैशांचे सर्व व्यवहार करणे शक्य होईल, असा विश्वास निती आयोगाने व्यक्त केला आहे.येथे सुरु असलेल्या तीन दिवसांच्या प्रवासी भारतीय परिषदेत युवकांसाठी आयोजित केलेल्या ‘स्टार्टअअप्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन्स’ यावरील चर्चासत्रात बोलताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा विश्वास व्यक्त केला.कांत म्हणाले की, वित्तीय तंत्रज्ञान आणि सामाजिक नवविचार या दोन्ही बाबतीत सध्या मोठ्या सृजनात्मक विध्वसांचे वातावरण आहे. यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारताला खूप मोठी झेप घेणे शक्य होईल.देशातील १०० कोटी नागरिकांची बोटांचे ठसे व डोळ््याच्या बाहुल्यांच्या नकला अशी बायोमेट्रिक माहितीचा खजिना असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. याचा वापर करून अलिकडेच सरकारने ‘भीम अ‍ॅप’ व ‘आधार’वर आधारित व्यवहार करण्याची यंत्रणा सुरु केली आहे. याचा संदर्भ देत कांत म्हणाले की, सन २०२० पर्यंत भारतीयांना कोणताही पैशाचा व्यवहार केवळ अंगठ्याचा (ठसा) वापरून अवघ्या ३० सेकंदात पार पाडणे शक्य होईल, तसे झाले म्हणजे ओघानेच क्रेटिड व डेबिट कार्ड, एटीएम व पीओएस यंत्रांची गरजच राहणार नाही. (वृत्तसंस्था)अर्थव्यवस्था तिप्पट वाढेलकांत म्हणाले की, सध्या भारताची अर्थव्यवस्था तीन खर्व डॉलरची आहे. य्पैकी दोन खर्व डॉलरची औपचारिक अर्थव्यवस्था आहे तर आणखी एक खर्व डॉलरची अर्थव्यवस्था अनौपचारिक आहे. सध्या देशातील फक्त २ ते २.५ टक्के लोक कर भरतात. औपचारिक अर्थव्यवस्था वाढून जास्तीत जास्त लोक कर यंत्रणेच्या कक्षेत आल्याखेरीज १० खर्व डॉलरचे लक्ष्य गाठणे शक्य होणार नाही. त्यासाठी डिजिटल व्यवहारांखेरीज तरणोपाय नाही.