शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य दिनासाठी देशभर चोख सुरक्षा

By admin | Updated: August 15, 2015 01:49 IST

अतिरेकी समुद्रमार्गे येऊन २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याची किंवा काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट किंवा त्याचे अपहरण केले जाण्याची

नवी दिल्ली : अतिरेकी समुद्रमार्गे येऊन २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याची किंवा काबूलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट किंवा त्याचे अपहरण केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला जात आहे. विशेषत: भाजपच्या कार्यालयांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने हल्ले हाणून पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून एअर इंडियाच्या दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण किंवा त्यात स्फोट घडविण्यासारखे प्रकार घडविले जाऊ शकतात, असे गुप्तचर सूत्रांनी म्हटले होते. अतिरेकी हवाई मार्गांचा अवलंब करू शकतात, पॅराग्लायडर्सचा वापर करून हल्ले घडविण्याची शक्यता पाहता गृहमंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. घातपात घडवून व्हीआयपींना लक्ष्य केले जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. अल-काईदाने भारतीय उपखंडात कारवाया वाढविल्या असून ही अतिरेकी संघटना भारतावर हल्ले घडवू शकते, अशी माहिती एप्रिलमध्ये गुप्तचर सूत्रांनी मिळविली होती. अलीकडेच गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुरेशी खबरदारी घेतली जात असली तरी इंडियन मुजाहिदीनसारख्या पाकिस्तानी संघटनांकडून किंवा सिमीच्या जुन्या सदस्यांकडून हल्ल्यांचा धोका कमी झालेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)