ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - भारतात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा पहिल्यांदा हिंदूच असतो, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. सर्व हिंदू म्हणूनच पहिल्यांदा जन्माला येत असून, काही ते मान्य करतात तर काही जण करत नाही. एवढेच नव्हे तर मुस्लिम व्यक्तीही राष्ट्रीयत्वानं हिंदूच असते. ते फक्त स्वतःच्या विश्वासाने मुस्लिम असतात, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. मध्य प्रदेशमध्ये आठ दिवसांच्या दौ-यावर असताना त्यांनी बैतुलमध्ये हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, जसे की इंग्लंडमध्ये इंग्लिश लोक राहतात, तर अमेरिकेत अमेरिकन लोक आणि जर्मनीत जर्मन लोक राहतात. त्यामुळेच हिंदुस्थानात हिंदू लोक राहतात. मुस्लिम लोकही राष्ट्रीयत्वानं हिंदूच असून, ते फक्त विश्वासानं मुस्लिम असतात. तसेच राष्ट्रीय मुस्लिम मंचही राष्ट्रीयत्वानं हिंदू असल्यानेच आरती म्हणतो. ते फक्त विश्वासानं स्वतःला मुस्लिम समजतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती, धर्म आणि भाषेच्या पलिकडे जाऊन हे वक्तव्य केलं आहे.
भारतात सर्व हिंदू म्हणूनच जन्माला येतात- मोहन भागवत
By admin | Updated: February 9, 2017 17:49 IST