शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पथलगढी आंदोलकांनी अपहरण केलेल्या चारही पोलिसांची स्थानिकांच्या मदतीने ७२ तासांत सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:05 IST

झारखंडमधील भाजपाचे खासदार करिया मुंडा यांच्या खुंटी जिल्ह्यातील निवासस्थानातून तीन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या चार पोलिसांची सुटका

सोनाली दास  रांची : झारखंडमधील भाजपाचे खासदार करिया मुंडा यांच्या खुंटी जिल्ह्यातील निवासस्थानातून तीन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या चार पोलिसांची सुटका करण्यात तपास यंत्रणांना शुक्रवारी यश आले आहे. पथलगढी आंदोलनाच्या समर्थकांनी या पोलिसांना पळवून नेले होते.राज्याचे पोलीस महासंचालक डी. के. पांडे यांनी सांगितले की, स्थानिक लोकांच्या मदतीमुळेच विनोद केरकेट्टा, सिअन सुरिन, नागेंद्र सिंह, सुबोध कुजूर या चारही पोलिसांची सुटका करणे शक्य झाले.तीन पोलिसांचे अपहरण झाले असावे व चौथा रजेवर आहे, असे गुरुवारपर्यंत सांगण्यात येत होते. पण चौथ्यालाही ाळवून नेल्याचे नंतर स्पष्ट झाले. पथलगढी आंदोलकांनी २६ जून रोजी खासदार करिया मुंडा यांच्या अनिंगडा-चांदिहदिहच्या घरी मोर्चा नेला व तेथून चारही पोलिसांचे अपहरण केले होते. (वृत्तसंस्था)काय आहे पथलगढी आंदोलन?पथलगढी आंदोलनातील लोक हे ग्रामसभांना स्वायत्त संस्था समजतात. झारखंडमधील आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये केंद्र वा राज्य सरकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, अशी पथलगढी आंदोलनाची भूमिका आहे. त्यामुळे ते सरकारी कर्मचारी किंवा पोलिसांना गावात येऊच देत नाहीत. तसे फलकच गावाबाहेर लावण्यात आले आहेत. यापैकी कोणी गावात यायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर दगडफेक केली जाते. त्यासाठी गावाच्या वेशीवर दगडाचे कुंपण घालण्यात येते. आमच्या गावात आमचेच कायदे चालतील, भारत सरकारच्या कायद्यांना आम्ही जुमानत नाही अशी भूमिका पथलगढी आंदोलकांची आहे.पाच महिलाकार्यकर्त्यांवर बलात्कारपोलिसांचे अपहरण करणाऱ्यांची माहिती देणाºयांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस झारखंड सरकारने गुरुवारी जाहीर केले होते. झारखंडमधील कोचांग गावात पथनाट्याद्वारे सामाजिक जागृती करण्यासाठी गेलेल्या पाच महिला कार्यकर्त्यांवर गेल्या आठवड्यातच पथलगढी आंदोलनाच्या समर्थकांनी बलात्कार केला होता. त्यांचेही आधी अपहरण करण्यात आले होते.